24 C
Mumbai
Saturday, November 30, 2024
घरविशेषछिंदवाड्यात काँग्रेसला धक्का, विक्रम आहाके यांचा भाजपमध्ये प्रवेश!

छिंदवाड्यात काँग्रेसला धक्का, विक्रम आहाके यांचा भाजपमध्ये प्रवेश!

कमलनाथ यांचे निकटवर्तीय

Google News Follow

Related

लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला एकामागून एक धक्के बसत आहेत.छिंदवाड्याचे महापौर विक्रम अहाके यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी अमरवाड्याचे आमदार कमलेश शहा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावर काँग्रेसचे उमेदवार नकुल नाथ यांनी त्यांना देशद्रोही म्हटले. हा आदिवासी नेत्याचा अपमान असल्याचे सांगण्यात आले आणि त्यामुळे दुखावले गेल्याने विक्रम आहाके यांनी भाजपचे सदस्यत्व घेतल्याचे सांगितले.दरम्यान, छिंदवाडा हा
काँग्रेस आणि कमलनाथ यांचा बालेकिल्ला मानला जातो.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव आणि भाजप प्रदेशाध्यक्ष व्ही.डी.शर्मा यांच्या उपस्थितीत सोमवारी(१ एप्रिल) छिंदवाड्याचे महापौर विक्रम आहाके यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.यावेळी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव म्हणाले की, नकुलनाथ यांनी छिंदवाडा येथील अमरवाड्याचे आमदार कमलेश शहा यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे आपण खूप दुखावलो आहोत. शहा हे आदिवासी समाजाचे मोठे नेते आहेत.

हे ही वाचा:

हिंदू रिक्षा चालकावर जमावाचा हल्ला

अरविंद केजरीवालांना १४ दिवसांची न्यायालयीने कोठडी

‘मॉस्को हल्ल्याशी संबंध असल्याचा रशियाचा आरोप धादांत खोटा’

मविआमध्ये एकोपा नाही; प्रकाश आंबेडकरांचा घाणाघात

 

विक्रम आहाके हे देखील आदिवासी आहेत. विक्रम यांच्यासोबत छिंदवाडा महानगरपालिकेच्या जल विभागाचे अध्यक्ष प्रमोद शर्मा, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष सिद्धांत थानेसर, माजी एनएसयूआय जिल्हाध्यक्ष आशिष साहू, माजी एनएसयूआय जिल्हा उपाध्यक्ष धीरज राऊत, माजी एनएसयूआय जिल्हा कार्याध्यक्ष आदित्य उपाध्याय, एनएसयूआयचे माजी विधानसभा अध्यक्ष सुमित दुबे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला.

दरम्यान, कमलनाथ यांच्या बालेकिल्ल्यात घुसण्यासाठी भाजपने मोठी रणनीती तयार केली आहे. यापूर्वी माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि त्यांचा मुलगा नकुल नाथ भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती.मात्र ती अयशस्वी झाली.छिंदवाडामधील भाजपचे अधिकारी दावा करत आहेत की, हजारो काँग्रेसजन पक्षात सामील झाले आहेत. २०१९ मध्ये नकुलनाथ यांनी लोकसभा निवडणुकीत सुमारे ३७ हजार मतांनी विजय मिळवला होता. कमलनाथ यांनी विधानसभा निवडणुकीत २५ हजार मतांनी विजय मिळवला. अशा परिस्थितीत यावेळी माजी मुख्यमंत्र्यांसमोर आपला बालेकिल्ला वाचवणे मोठे आव्हान असेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
202,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा