अतिक अहमद याच्याप्रमाणेच मुख्तार अन्सारीचेही नाव हत्या, हत्येचा प्रयत्न, धमकी प्रकरणांत सातत्याने येत होते. त्यांनी तीन दशके कायदा हातात घेऊन गुंडगिरी केली. नंतर दोघांनीही राजकारणात प्रवेश घेतला. स्वतःची टोळी बनवली. अतिक आणि मुख्तार या दोघांचा मृत्यूही अटकेत असतानाच झाला. फरक केवळ इतकाच की अतिकला गोळी झाडून मारण्यात आले तर मुख्तारने तुरुंगातच जीव सोडला. अतिकच्या अंत्यसंस्कारालाही त्याची पत्नी आणि मुलगा हजर नव्हते. आता मुख्तारच्या अंत्यसंस्कारालाही त्याची पत्नी आणि मुलगा येण्याची शक्यता कमी आहे.
माफिया मुख्तार याचा मृतदेह बांदामधील मेडिकल कॉलेजमध्ये शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाइकांना सोपवण्यात आला आहे. तसेच, त्याचे शव गाझिपूरला रवाना करण्यात आले आहे. गाझिपूरमध्ये मुख्तार याचे वडील आणि आई यांच्या कबरीच्या शेजारीच त्याची कबर खोदण्यात आली आहे. मुख्तारचे शव आधी त्याच्या घरी पोहोचेल. त्यानंतर त्याचे शव कालिबागजवळील कब्रस्तानमध्ये रवाना होईल.
अतिकच्या अंत्यसंस्कारावेळी एक मुलगा काही दिवसांपूर्वीच पोलिस चकमकीत मारला गेला होता. तर, दोन मुले संरक्षण गृह आणि एक तुरुंगात होता. आता मुख्तार अन्सारी याचा मुलगा अब्बासही तुरुंगात आहे. त्याला अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी परवानगी मिळू शकलेली नाही. त्याने उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात यासाठी परवानगी मागितली होती. मात्र त्यावर सुनावणी होऊ शकली नाही.
हेही वाचा :
बेंगळुरू कॅफे स्फोट; दोन संशयितांची माहिती देणाऱ्यास २० लाखांचे बक्षीस जाहीर
केजरीवालांनंतर कथित मद्य धोरण घोटाळाप्रकरणी मंत्री कैलाश गेहलोत यांना ईडीकडून समन्स
इंजिनीअरच्या हत्येनंतर चीनने थांबवले पाकिस्तानमधील धरणाचे बांधकाम
बेंगळुरूला हरवून कोलकाता दुसऱ्या स्थानी; चेन्नई अव्वल
एकसारखे गुन्हे
अतिकच्या नावावर सर्वांत मोठ्या गुन्ह्याची नोंद होती ती म्हणजे राजू पाल हत्याकांड. तेव्हा अतिकच्या गुंडांनी आमदार राजू पाल यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. तेव्हा त्यांच्यासोबत असणारी माणसेही मारली गेली होती. याचप्रकारे मुख्तार याच्यावरही आमदार कृष्णानंद यांच्या हत्येचा आरोप होता. त्यांच्यावरही गोळ्यांचा वर्षाव करण्यात आला होता. तेव्हाही त्यांच्यासोबत असणारी माणसे मारली गेली होती. राजू पाल आणि कृष्णानंद यांचा दोष एकच होता. राजू पाल याने अतिक अहमदचा भाऊ अशरफ याला निवडणुकीत पराभूत केले होते तर, कृष्णानंद राय यांनी मुख्तारचा भाऊ अफजाल अन्सारी याला पराभूत केले होते.