लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. काँग्रेसचे बडे नेते शिवराज पाटील यांच्या सून अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेससाठी हा मोठा झटका मानला जात आहे.
अर्चना पाटील चाकूरकर यांच्या पक्ष प्रवेशाने भाजपाला लातूरमध्ये ताकद मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत अनेक मोठी कामे केली आहेत. विकासाच्या कामाने देशाची प्रगती झाली आहे. नरेंद्र मोदींनी महिलांसाठी नारी शक्ती वंदन बिल आणलं. त्यामुळे राजकारणात येण्यापासून घाबरणाऱ्या महिलांना आता राजकारणात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयाने प्रभावित होऊनच भाजपामध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे, असं अर्चना पाटील चाकूरकर म्हणाल्या.
हे ही वाचा:
एनआयएकडून आठ टीएमसी नेत्यांना समन्स
केजरीवालांनंतर कथित मद्य धोरण घोटाळाप्रकरणी मंत्री कैलाश गेहलोत यांना ईडीकडून समन्स
विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद मिटला
व्याभिचारी महिलेला सार्वजनिकरीत्या दगडाने ठेचून मारणार
भाजपा कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी काँग्रेसचे बडे नेते शिवराज पाटील यांच्या सून अर्चना चाकूरकर आणि उदगीरचे सात वेळा नगराध्यक्ष असलेले राजेश नितुरे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी शिवराज पाटील यांची स्तुती केली. शिवराज पाटील यांनी मूल्यावर आधारीत राजकारण केलं आहे. त्यांनी अत्यंत चांगलं काम केलं. समाजकारणात त्यांचा मोठा वाटा आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.