दक्षिण आफ्रिकेत एक भीषण बस अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण बस अपघतात ४५ प्रवाशांनी आपला जीव गमावला आहे. एका पुलावरून कोसळून हा बस अपघात झाल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनेत केवळ आठ वर्षांची एक मुलगी बचावली असून तू गंभीर जखमी आहे. या जखमी मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातग्रस्त बस ही बोत्सवाना देशात इस्टर भाविकांना घेऊन दक्षिण आफ्रिकेच्या उत्तर पूर्व भागातील लिम्पोपो प्रांतातील मोरिया शहरात जात होती. यावेळी जोहान्सबर्गपासून तब्बल ३०० किमी दूर उत्तरेला मोकोपेन आणि मार्केन दरम्यान एका पुलावर बसला हा भीषण अपघात झाला. बीबीसीच्या अहवालानुसार, दक्षिण आफ्रिकेतील पब्लिक ब्रॉडकास्टर एसएबीसीने दिलेल्या माहितीनुसार, चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस पुलावरील बॅरिकेटरला धडकून दरीत कोसळली. बस खाली कोसळल्यानंतर बसने पेट घेतला. या बसमधून ४६ प्रवासी प्रवास करत होते. यातील ४५ प्रवाशांचा जीव गेला असून आठ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान गुरूवारी रात्री उशीरापर्यंत बचावकार्य सुरू होते.
हे ही वाचा:
कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेशात १४४ लागू
गँगस्टर मुख्तार अन्सारीचा मृत्यू
शिवसेनेची यादी जाहीर; शेवाळे, बारणे, मंडलिक यांना उमेदवारी
दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी बोत्सवानामधील त्यांचे समकक्ष, राष्ट्राध्यक्ष मोक्ग्वेत्सी मासीसी यांना शोक व्यक्त करण्यासाठी फोन केला, असे राष्ट्रपती कार्यालयाने गुरुवारी उशिरा जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.