लोकसभा निवडणुक अगदी काही दिवसांवर आलेली असताना अद्याप राज्यातील जागा वाटपावर महाविकास आघाडीने तोडगा काढलेला नाही. अशातच वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीसोबत युतीसाठी चालू असणारे प्रयत्न सोडून देत स्वतंत्र निवडणुका लढवण्याची घोषणा केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. वंचित आणि मविआ यांच्यातील वाद सातत्याने चव्हाट्यावर येत होते. अशातच वंचितने भूमिका स्पष्ट केल्यामुळे याचा दणका मविआला निवडणुकीत बसणार असल्याचे चित्र आहे.
एकीकडे प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेनंतर दुसरीकडे आमची अजूनही प्रकाश आंबेडकरांशी चर्चा चालू आहे, अशी भूमिका मविआचा घटकपक्ष असलेल्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मांडली आहे. यानंतर प्रकाश आंबेडकरांनी एक्सच्या माध्यमातून संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधत संजय राऊत खोटे बोलत आहेत, असं त्यांनी स्पष्ट केले आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्रपणे आपल्या पक्षाचे उमेदवार जाहीर केले. यामुळे निश्चितचं मत विभागली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, “प्रकाश आंबेडकर आणि आमचे विचार एकच आहेत. आमची त्यांच्याशी चर्चा चालू आहे.” प्रकाश आंबेडकर यांनी मात्र ६ मार्चच्या बैठकीचा उल्लेख करत राऊतांवर सडकून टीका केली आहे.
हे ही वाचा:
रामटेकच्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वेंचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द
‘निवडणूक लढवण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत’
२८ वर्षे जुन्या खटल्यात आयपीएस अधिकारी संजीव भट्ट दोषी
संदेशखालीतील महिला म्हणजे ‘शक्तीस्वरूप’
“संजय राऊत आणखी किती खोटं बोलणार. तुमचे आणि आमचे विचार एक असतील तर मग आम्हाला तुम्ही बैठकीला का बोलवत नाही. ६ मार्च रोजी हॉटेल फोर सिजन्समध्ये एक बैठक झाली. या बैठकीला तुम्ही आमच्या प्रतिनिधींना आमंत्रित का केलं नाही. आजदेखील एक बैठक आहे. या बैठकीलाही तुम्ही आम्हाला आमंत्रित केलेलं नाही. सिल्व्हर ओकच्या बैठकीत तुम्ही काय भूमिका घेतली होती, हे आम्हाला ठावूक आहे. तुम्ही माझ्याविरोधात अकोल्यात उमेदवार देण्याची भूमिका मांडली होती. हे खरं नाही का? तुम्ही एकीकडे युती करण्यास आम्ही उत्सुक आहोत, असे सांगताय. दुसरीकडे आम्हाला पाडण्याचे नियोजन करताय,” अशी टीका करत प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊत यांचा दुटप्पीपणा उघड केला आहे.
संजय, कितना झूठ बोलोगे!?
अगर आपके और हमारे विचार एक हैं तो हमें बुलाते क्यों नहीं हैं मीटिंग में?
6 मार्च की फोर सीजन्स होटल मैं हुई बैठक के बाद आपने हमारे किसी प्रतिनिधि को आमंत्रित क्यों नहीं किया?
आज भी आप वंचित को आमंत्रित किए बिना क्यों बैठक कर रहे है?
आपने तो सहयोगी… pic.twitter.com/EMbHh6VFME
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) March 28, 2024