पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य संजीव सान्याल यांच्या मते, नागरी सेवा परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी पाच ते आठ वर्षे करत असलेली तयारी म्हणजे तरुणांच्या ऊर्जेचा अपव्यय आहे. ज्यांना प्रशासक व्हायचे आहे, त्यांनीच यूपीएससी किंवा यांसारख्या परीक्षांसाठी प्रयत्न केला पाहिजे, असे ते म्हणाले.
सान्याल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबतची प्रतिक्रिया दिली. ‘लाखो जण जीवनशैलीच्या रूपात या परीक्षेच्या तयारीसाठी किंवा परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी पाच ते सात वर्षे व्यतीत करतात. हा तरुणांच्या ऊर्जेचा अपव्यय आहे. ही आश्चर्याची बाब ठरू शकते. मात्र कधीकाळी परीक्षा उत्तीर्ण होणारे अधिकारीदेखील ही बाब मान्य करतात. जे नागरिक खरोखरच प्रशासक होऊ इच्छितात, त्यांच्यासाठी एक ते दोन संधी ठीक आहेत. मात्र यासाठी २० ते ३० वर्षांपर्यंत वेळ घालवणे योग्य नव्हे.
हे ही वाचा:
भाजपामध्ये प्रवेश केलेल्या नवीन जिंदाल यांच्या मातोश्री सावित्री जिंदाल यांचा काँग्रेसला रामराम!
अबब! आयपीएलमध्ये दोन्ही डावात मिळून ५२३ धावांचा डोंगर
२८ वर्षे जुन्या खटल्यात आयपीएस अधिकारी संजीव भट्ट दोषी
लोकसभा निवडणुकीपूर्वी मविआचे विसर्जन करण्याचे डील?
‘कोटासारखे शहर हे केवळ परीक्षा देण्यासाठी ओळखले जाते. ती पण अशी परीक्षा जिच्यात केवळ एक टक्क्याहून कमी परीक्षार्थी यशस्वी होतात. हे प्रत्येक वर्षी घडते. तुम्ही विचार करून पाहा, जर हाच प्रयत्न अन्य क्षेत्रांमध्ये केला गेल्यास त्याचा काय परिणाम होऊ शकतो,’ असे सुप्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ सान्याल म्हणाले.
लोकसेवा आयोग (यूपीएससी), भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय विदेश सेवा (आयएफएस) आणि भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) आयोगातर्फे अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी प्रत्येक वर्षी तीन टप्प्यांत (प्राथमिक, मुख्य आणि व्यक्तिगत मुलाखत) सिव्हिल सेवा परीक्षेचे आयोजन केले जाते. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विविध शहरांमधील लाखो विद्यार्थी तयारी करतात आणि शिकवण्यांसाठी लाखो पैसे खर्च करतात.