30 C
Mumbai
Saturday, November 30, 2024
घरविशेषहैदराबादच्या २७७ धावांपुढे मुंबईची शरणागती

हैदराबादच्या २७७ धावांपुढे मुंबईची शरणागती

३१ धावांनी पराभव

Google News Follow

Related

हैदराबादच्या संघाने तीन विकेट गमावून ३७७ धावांचा डोंगर उभारून बुधवारी आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावसंख्येची नोंद केली. या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबईच्या खेळाडूंची दमछाक झाली आणि त्यांना ३१ धावांनी पराभव पत्करावा लागला. मुंबईचा हा सलग दुसरा पराभव.

बुधवारी हैदराबादची गर्दी ऐतिहासिक सामन्याची साक्षीदार ठरली. यावेळी क्रिकेटरसिकांना सर्वाधिक षटकार आणि सर्वाधिक धावसंख्या उभारताना याचि देही याचि डोळा पाहता आली. २७८ धावांचे लक्ष्य गाठताना रोहित शर्मा (२६) याने मुंबईसाठी २००वा सामना खेळला. त्याला इशान किशनची (१३ चेंडूंत ३४) चांगली साथ मिळाली. तिलक वर्मा (३४ चेंडूंत ६४) यानेही सहा षटकार खेचले. १४ व्या षटकांत मुंबईच्या तीन बाद १८२ धावसंख्या झाली होती आणि सात विकेटही हातात होत्या. नमन धीर आणि वर्मा आक्रमक खेळी करत होते. वर्मा याने धावगती राखण्यासाठी विशेषतः फिरकीपटूवर लक्ष केंद्रित केले. त्याने षटकार खेचून सहजच ५० धावा केल्या. मात्र हैदराबादच्या कमिन्सने टाइम-आऊटमध्ये वर्मा याला बाद केले. हार्दिक आणि टिम डेव्हिड यांनी मुंबईचा खेळ सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र हैदराबादच्या गोलंदाजांपुढे तो निष्प्रभ ठरला.

हैदराबादने तीन विकेट गमावून २७७ धावांचा डोंगर रचून सन २०१३ मध्ये बेंगळुरूने रचलेला विक्रम मोडला. बेंगळुरूने पुण्याविरोधात पाच विकेट गमावून २६३ धावसंख्या उभारली होती. हेन्रिच क्लासेन, अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेड यांच्या दमदार फलंदाजींमुळे हैदराबादला ही धावसंख्या उभारता आली.

हे ही वाचा:

नोटांवर झोपलेल्या आसामच्या राजकीय नेत्याच्या छायाचित्रावरून वाद

‘निवडणूक लढवण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत’

२८ वर्षे जुन्या खटल्यात आयपीएस अधिकारी संजीव भट्ट दोषी

संदेशखालीतील महिला म्हणजे ‘शक्तीस्वरूप’

ट्रेव्हिस हेड (२४ चेंडूंत ६४) आणि अभिषेक शर्मा (२३ चेंडूंत ६३) यांनी दमदार फलंदाजी करून मुंबईच्या गोलदाजांना निष्प्रभ केले. त्याने डेव्हिड वॉर्नरचा हैदराबादच्या वतीने जलद ५० धावांचा विक्रम मागे टाकला. त्याने १८ चेंडूंत ही कामगिरी केली. तर, लगेचच अभिषेकने हा विक्रमही तोडून अवघ्या १६ चेंडूंत अर्धशतक ठोकले. एडन मार्करम यानेही २८ चेंडूंत ४२ धावा केल्या. हेड बाद झाल्यानंतर अभिषेकने गोलदाजांवर आक्रमण केले. त्याने सात षटकार आणि तीन चौकारांची आतषबाजी केली. त्यानंतर आयपीएलमध्ये पदार्पण करणारा १७ वर्षीय दक्षिण आफ्रिकन क्रिकेटपटू क्वेना माफाका याने शेवटच्या चार षटकांत ६६ धावा दिल्या. क्लासेन याने ३४ चेंडूंत नाबाद ८० धावा केल्या. त्यात सात षटकार आणि चार चौकारांचा समावेश होता. तर, एडन मार्करम याने २८ चेंडूंत ४२ धावा केल्या.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
203,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा