मुंबई महानगरपालिकेने कोरोना रुग्णवाढ होत असताना पंचतारांकित हॉटेल्सचा वापर करायला सुरूवात केली आहे. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेने दोन पंचतारांकित हॉटेलच्या वापराला मंजूरी देखील दिली आहे. त्यामुळे कोविडग्रस्त रुग्णांसाठी विलगीकरणासाठी बेडची सोय होऊ शकेल.
दोन पंचतारांकित हॉटेलमध्ये एकूण ४२ खाटांची सोय करण्यात आली आहे. त्यापैकी २२ खाटा मरिन ड्राईव्हच्या इंटर कॉन्टिनेन्टल हॉटेलमध्ये तर २० खाटांची सोय बीकेसीच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. जर रुग्णवाढ अशीच होत राहीली तर येत्या काही काळात मुंबई महानगरपालिका आणखी काही हॉटेल्सना देखील परवानगी देणार आहे.
हे ही वाचा:
मुख्यमंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे स्थानिक प्रशासन मुजोर- अतुल भातखळकर
देशात कोरोना लसीचा तुटवडा नाही- डॉ. हर्षवर्धन
वाशीमध्ये उपचारादरम्यान तरुणीवर बलात्कार?
राजेश टोपेंना शहाणपण आग लागेपर्यंत का सुचले नाही
मुंबईचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या महितीनुसार सरकार मुंबईत तीन जम्बो कोविड रुग्णालये उभारणार आहे. त्याबरोबरच रुग्णांच्या उपचारासाठी काही हॉटेल्साचादेखील वापर केला जाणार आहे.
मुंबईत मोठ्या प्रमाणत होत असलेल्या रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे. या हॉटेलमध्ये कोविड-१९ मधून बऱ्यापैकी बरे झालेल्या रुग्णांना हलवण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या रुग्णांना हॉस्पिटलमधल्या बेडची गरज असेल त्यांना तो उपलब्ध होऊ शकेल.
मुंबईमध्ये बुधवारी ९,९३१ रुग्ण आढळले होते, तर कोविड-१९ मुळे ५४ रुग्णांच मृत्यु झाला. त्यामुळे सध्या मुंबईत ५४५,१९५ उपचाराधिन रुग्ण आहेत. कोविडला रोखण्यासाठी महाराष्ट्रात १४ एप्रिलपासून १४४ कलम लागू करण्यात आले आहे. त्याद्वारे संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.