लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशातच ठाकरे गटाने आपल्या १७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यानंतर मात्र, ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. ठाकरे गटाचे लोकसभेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांना ईडीचे समन्स आले आहे. अमोल किर्तीकर यांना खिचडी घोटाळ्यात ईडीने समन्स पाठवले आहेत. अमोल किर्तीकर हे मुंबई वायव्य मतदार संघातून लोकसभेचे उमेदवार आहेत.
करोना काळात मुंबई महापलिकेत झालेल्या कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी अमोल कीर्तिकरांना ईडीने समन्स बजावले आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी हे समन्स देण्यात आले असून त्यांना बुधवार, २७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी बोलवले आहे. खिचडी घोटाळ्यात सूरज चव्हाण यांच्यासोबत अमोल कीर्तिकर यांचे नाव समोर आले होते. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली होती. त्यानंतर आता ईडीने समन्स पाठवून चौकशीला बोलवले आहे. अमोल कीर्तिकर यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले असून खिचडी गैरव्यवहार प्रकरणात चौकशी होणार असल्याची माहिती आहे.
Mumbai | Enforcement Directorate summons Shiv Sena UBT leader Amol Kirtikar today in connection with alleged Khichdi scam
— ANI (@ANI) March 27, 2024
हे ही वाचा:
रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष स्वामी स्मरणानंद यांचे वयाच्या ९४व्या वर्षी निधन
वॉशिंग मशिनमध्ये नोटांची थप्पी; ईडीने छाप्यात जप्त केले २.५४ कोटी रुपये
‘बिग बॉस’ फेम मुनव्वर फारुकीवर गुन्हा दाखल
अमेरिकेत जहाज धडकून ब्रिज कोसळला
याआधी सुरज चव्हाण यांना ईडीकडून या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता अमोल किर्तीकरांना समन्स बजावण्यात आला आहे. अशातच ठाकरे गटाकडून लोकसभेची पहिली यादी जाहीर झाली असून त्यामध्ये अमोल किर्तीकरांना उमेदवारी देण्यात आली आहे.