“उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीची यांची युती आता आता राहिली नाही,” असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आलेल्या असताना ठाकरे गटाला हा धक्का बसलेला आहे. महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही अशातच वंचितने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. यापूर्वीही अनेकदा त्यांनी मविआबद्दल त्यांचे तिखट मत मांडले होते. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत आता युती राहिली नाही, अशी मोठी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. “महाविकास आघाडीसोबत जमले तरच युती; नाही तर युती नाही,” अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. आमची आधी आघाडी होती पण ठाकरेंनी महाविकास आघाडीला त्यांनी प्राधान्य दिलं, अशी नाराजी प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंबद्दल व्यक्त केली.
“आम्हाला चार जागा कधीच ऑफर केल्या गेल्या नाहीत. महाविकास आघाडीने आम्हाला फक्त तीन जागा ऑफर केल्या. त्यातील एक जागा अकोल्याची होती. आम्ही काय म्हणतोय कॅरी करण्यापेक्षा संजय राऊत काय म्हणतात हे जास्त कॅरी केलं जातंय, त्यामुळे आमची भूमिका लोकांपर्यंत पोहचत नाही. महाविकास आघाडीचा तिढा मिटणार नसेल तर आमची एन्ट्री होऊन काय उपयोग आहे?” असा सवाल करत प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र डागलं आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, ते २६ मार्चपर्यंत थांबणार अन्यथा ते लोकसभेसाठी त्यांची भूमिका जाहीर करणार आहोत. प्रकाश आंबेडकर यांनी एक प्रकारे महाविकास आघाडीला तीन दिवसांचा अल्टिमेटमच दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा या तीन दिवसात सुटणार का? याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
हे ही वाचा :
केजरीवालांच्या अटकेवर टिपण्णी करणाऱ्या जर्मनीला भारताने सुनावले खडेबोल
स्वातंत्र्यवीर ‘सावरकर’ बॉक्स ऑफिसवर हिट
भारत- भूतानमध्ये व्यापार, डिजिटल कनेक्टिव्हिटी, अंतराळ क्षेत्रातले सामंजस्य करार
टीएमसीच्या नेत्या महुआ मोईत्रा यांच्या संबंधित ठिकाणांवर सीबीआयकडून धाडसत्र
शाहू महाराजांना पाठिंबा- प्रकाश आंबेडकर
कोल्हापूरमध्ये वंचितची चांगली ताकद असून पश्चिम महाराष्ट्रातही सुस्थिती आहे. काँग्रेसने कोल्हापुरातून शाहू महाराज यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांना आम्ही पाठिंबा देत आहोत. शाहू महाराजांची विचारसरणी आणि आमची विचारसरणी जवळची आहे. शाहू महाराज यांना निवडून आणण्यासाठी जे प्रयत्न करायचे ते सर्व प्रयत्न आम्ही करणार आहोत. मागे जे घडलं ते पुन्हा घडू नये याची खबरदारी घेणार आहोत, असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे.