पंतप्रधान नरेंद मोदींची तुलना औरंगजेबाशी करणे आता उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांना महागात पडण्याची शक्यता आहे.भारतीय जनता पक्षाकडून संजय राऊतांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.निवडणूक आयोगाने संजय राऊत यांच्यावर कारवाई करत गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना औरंगजेबाशी केली होती.शिवसेना आणि आमच्या स्वाभिमाना विरोधात औरंगजेबी वृती गुजरात आणि दिल्लीतून महाराष्ट्रात चाल करून येत आहे, असे संजय राऊत म्हणाले होते.संजय राऊत यांच्या बेताल वक्तव्यावरून भाजपने देखील सडेतोड उत्तर दिले.आत तर थेट कारवाई करण्याची मागणी भाजपने केली आहे.याबाबत भाजपचे सचिव विवेकानंद गुप्ता यांनी निवडणूक आयोगात तक्रार केली आहे.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींचे भूतानमध्ये भव्य स्वागत!
केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयातील याचिका मागे घेतली
कर्नाटक: काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत १७ पैकी ११ उमेदवार मंत्र्यांचे नातेवाईक!
जसे कर्म तसे फळ…. कुमार विश्वास यांचा केजरीवाल यांना टोला
संजय राऊत यांचे विधान बदनामीकारक आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधात विद्वेष पसरवणारे असल्याचा दावा या तक्रारीमध्ये करण्यात आला आहे.निवडणूक आयोगाने या प्रकरणाची दखल घेऊन कारवाई करत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपचे सचिव विवेकानंद गुप्ता यांनी केली आहे.लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.दरम्यान, संजय राऊत यांच्या वक्तव्यावर निवडणूक आयोग कारवाई करतोय का ते पाहावे लागेल.