लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून आज (२२ मार्च) चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे.या यादीमध्ये एकूण १५ जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपच्या या चौथ्या यादीत पुदूच्चेरी आणि तमिळनाडू राज्यातील एकूण १५ जागांचा समावेश आहे.
भाजपने काल(२१ मार्च) तिसरी यादी जाहीर केली होती.तिसऱ्या यादीमध्ये केवळ नऊ उमेदवारांचा समावेश होता.या यादीमधील सर्व नावे तामिळनाडू लोकसभा मतदारसंघातील होती.यामध्ये तमिळनाडूचे भाजपचे नेते तथा माजी आयएएस अधिकारी के.अण्णामलाई यांच्या नावाचा समावेश होता.अण्णामलाई कोईंबतूर येथून निवडणूक लढवणार आहेत.
हे ही वाचा:
वडील गृहमंत्री असताना कार्ति चिदंबरमनी घेतले ५० लाख
उत्तर प्रदेशमधील मदरसा शिक्षण कायदाच अवैध
पंतप्रधान मोदींचे भूतानमध्ये भव्य स्वागत!
अण्णा हजारे बोलले, केजरीवाल यांची केली पोलखोल
BJP releases the 4th list of the Lok Sabha Candidates from Puducherry and Tamil Nadu. pic.twitter.com/RGSctUWX7A
— ANI (@ANI) March 22, 2024
दरम्यान, पहिल्या यादीत भाजपने एकूण १९५ उमेदवारांची घोषणा केली होती, ज्यामध्ये मध्य प्रदेश आणि राजस्थानवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. पक्षाने १३ मार्च रोजी ७२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आदी राज्यांतील उमेदवारांची घोषणा करण्यात आली.तर आज पक्षाकडून तिसरी यादी जाहीर करण्यात आली.यामध्ये केवळ ९ उमेदवारांची नावे आहेत.
ही सर्व नावे तामिळनाडू लोकसभा मतदारसंघातील आहेत.आज पक्षाने चौथी यादी जाहीर केली.चौथ्या यादीमध्ये पुदूच्चेरी आणि तमिळनाडू राज्यातील एकूण १५ जागांचा समावेश आहे.भाजपने आतापर्यंत चार याद्या जाहीर केल्या असून यामध्ये एकूण २९१ उमेदवारांचा सहभाग आहे.