राजकारणात अनेक स्टार्टअप सुरू केले जातात. त्यांना पुन्हा पुन्हा लॉन्च करावे लागते असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. दिल्लीत सुरु असणाऱ्या स्टार्टअप महाकुंभ कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले बरेच लोक स्टार्टअप्स लाँच करतात, पण तुमच्यात आणि त्यांच्यात फरक हा आहे की तुम्ही प्रयोगशील आहात आणि अयशस्वी झाल्यास ददुसऱ्या स्टार्टअपवर शिफ्ट होता.
यावेळी पंतप्रधान मोदींनी भारताच्या स्टार्टअप इकोसिस्टममध्ये परिवर्तनीय बदल घडून आल्याचे अधोरेखित केले. मेट्रो केवळ शहरांपुरती मर्यादित न राहता ती आता सामाजिक संस्कृती बनली आहे. पूर्वी जेव्हा कोणी व्यवसायाबद्दल बोलायचे तेव्हा तो कल्पनांबद्दल नाही तर पैशाबद्दल बोलत असे. ते करावेच लागेल, पण पैसा कुठून आणणार, या स्टार्टअप इकोसिस्टमने हा विचार मोडल्याचे ते म्हणाले. सरकारच्या स्टार्टअप इंडिया उपक्रमाने नाविन्यपूर्ण कल्पनांना एक व्यासपीठ मिळाले आहे. अशा सर्व प्रयत्नांमुळे टियर २ आणि टियर ३ शहरांतील तरुणांना त्यांच्या कल्पना रुजवण्यात मदत झाली. आज, आम्ही अभिमानाने सांगू शकतो की आमची स्टार्टअप इकोसिस्टम मेगासिटींपुरती मर्यादित नाही. खरं तर लहान शहरांतील तरुण स्टार्टअप इकोसिस्टममध्ये क्रांती घडवून आणत आहेत.
हेही वाचा..
आयपीएल पहिल्या सामन्यात सूर्या तळपणार नाही?
कमाल आहे…पाकिस्तान दिवाळखोर तरी म्हणे भारतापेक्षा ‘आनंदी’
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट सांगितले की, भारतात आता १.२५ लाखांहून अधिक स्टार्टअप्स आणि सुमारे ११० युनिकॉर्न आहेत. युनिकॉर्न हे खाजगी मालकीच्या स्टार्टअप कंपनीचे पदनाम आहे ज्याचे मूल्य $१ अब्जापेक्षा जास्त आहे. भारतीय उद्योजकांनी लवकरात लवकर त्यांच्या स्टार्टअप्सचे पेटंट घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. भारत ही जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम आहे. १.२५ लाखांहून अधिक नोंदणीकृत स्टार्टअप्स आहेत जे १२ लाखांहून अधिक लोकांना रोजगार देतात. भारतात ११० पेक्षा जास्त युनिकॉर्न आहेत. आमच्या स्टार्टअप्सनी १२ हजार पेक्षा जास्त पेटंट नोंदवले आहेत.