जपानने सुमारे एका दशकानंतर फुकुशिमा दाईची अणुविद्युत केंद्रातील पाणी प्रशांत महासागरात सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून जपानला मोठ्या प्रमाणातील टिकेला सामोरे जावे लागले. जपानला एकट्या अमेरिकेने पाठिंबा दर्शवला आहे.
येत्या दोन वर्षात जपान फुकुशिमामधील पाणी प्रक्रिया करून मग प्रशांत महासागरात सोडणार आहे. जपानचे पंतप्रधान योशिहिडे सुगा यांनी दिलेल्या माहितीनुसार, फुकुशिमा प्रकल्प बंद करण्यासाठी पाणी प्रशांत महासागरात सोडणे हा एकमेव व्यवहारी मार्ग आहे.
हे ही वाचा:
९/११ च्या आधी अमेरिकेची अफगाणिस्तानातून माघार
‘रेमडेसिवीर’ काळा बाजाराचा मालवणी पॅटर्न
छगन भुजबळांकडून मोदी सरकारचे कौतुक
रेमडेसिवीरबाबत नागपूर खंडपीठाचा महत्त्वाचा निर्णय
सुमारे दशकभरापूर्वी ११ मार्च २०११ रोजी फुकुशिमा दाईची अणुऊर्जा प्रकल्पाला भूकंपाचा झटका बसला होता. त्यामुळे या प्रकल्पाचे नुकसान झाले होते. या प्रकल्पातील तीन अणुभट्ट्यांमध्ये वितळल्या होत्या. या प्रकल्पात भूजल आणि पावसाचे पाणी सातत्याने गोळा होत आहे. तेथे लावलेल्या पंपांद्वारे लक्षावधी टन पाणी दररोज काढले जात आहे आणि ते प्रक्रिया करून मोठ्या पिंपांमध्ये साठवले जात आहे. त्यामुळे हे पाणी समुद्रात सोडण्याचा निर्णय केव्हा ना केव्हा घेतला जाणारच होता.
मिळालेल्या माहितीनुसार या आण्विक प्रकल्पातील पाणी इंटरनॅशनल ऍटॉमिक एनर्जी एजन्सीच्या (आयएईए) मानकांनुसारच प्रशांत महासागरात सोडले जाणार आहे. ही संस्था देखील मानवाला आणि पर्यावरणाला नुकसान होणार नाही अशा मानांकनांपर्यंत प्रक्रिया करायला मदत करणार आहे.
किर्णोत्सर्गी पाण्यातील किर्णोत्सर्ग मोठ्या प्रमाणात कमी केला जाऊ शकतो. परंतू त्यातील किर्णोत्सर्गी ट्रिटीयमचे प्रमाण कमी करणे मात्र शक्य झालेले नाही. याचा मोठ्या प्रमाणा मानवाशी संपर्क आल्यास तो अतिशय घातक ठरतो. त्यामुळेच अनेक पर्यावरण प्रेमी संस्थांनी जपानच्या या निर्णयाचा विरोध केला आहे.