इंडियन प्रीमियर लीगच्या १७ व्या हंगामाचे बिगुल वाजविण्यात आले आहे. आयपीएल २०२४ चा पहिला सामना शुक्रवार, २२ मार्चपासून खेळवला जाणार आहे. मात्र आयपीएल सुरू होण्याआधीच मुंबई इंडियन्सला एक जोरदार धक्का बसला आहे. ३६० डिग्री फलंदाज म्हणून ओळखला जाणारा सूर्यकुमार यादव २४ मार्च रोजी गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध नसणार आहे.
कर्णधार हार्दिक चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणार
सूर्यकुमार यादव पहिला सामन्यात खेळला नाही, तर कर्णधार हार्दिक पंड्या चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. गेल्या दोन मोसमात हार्दिक गुजरात टायटन्सकडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत होता. हार्दिक हा गुजरातचा फलंदाजीचा आधारस्तंभ होता. सूर्या उपलब्ध नसेल तर पंड्या मुंबईसाठी त्याच भूमिकेत दिसू शकतो.
नेहाल वढेराला अंतिम अकरात स्थान मिळू शकते
सूर्यकुमार यादव खेळला नाही, तर नेहाल वढेरा आणि विष्णू विनोद यांच्यापैकी एकाचा अंतिम अकरात समावेश होऊ शकतो. मात्र, वढेरा यांचीच जास्त शक्यता आहे. कारण तो खालच्या फळीत स्फोटक फलंदाजी करू शकतो. तसेच गरजेनुसार गोलंदाजीही करू शकतो.
अशी असू शकते प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा आणि यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन डावाची सुरुवात करू शकतात. तर टिळक वर्मा तिसऱ्या क्रमांकावर खेळणार हे निश्चित आहे. अशा परिस्थितीत टॉप ऑर्डरमध्ये कोणताही बदल अपेक्षित नाही. मात्र कर्णधार हार्दिक पांड्या चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो. यानंतर पाचव्या क्रमांकावर नेहाल वढेरा आणि सहाव्या क्रमांकावर मोहम्मद नबी फलंदाजी करू शकतात.
हेही वाचा :
आयपीएलच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ‘ठोको ताली’
बदायूत दोन लहान सख्ख्या भावडांच्या हत्येनंतर वाद!
राखी सावंत अडचणीत, समीर वानखेडेंकडून मानहानीचा खटला दाखल!
प्युअर व्हेज फ्लीट सेवेच्या ‘टी-शर्ट’ वरून झोमॅटोचा युटर्न!
नबीच्या प्लेइंग इलेव्हनमधील स्थानामुळे मुंबई इंडियन्सची फलंदाजी भक्कम झाली आहे. त्याचबरोबर फिरकी गोलंदाजीही खूप मजबूत होईल. डेव्हिड आणि नबी मॅच फिनिशरची भूमिका बजावू शकतात. त्याचबरोबर अनुभवी पियुष चावला मुख्य फिरकी गोलंदाज ठरू शकतो. वेगवान गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर जसप्रीत बुमराह आणि आकाश मधवालसह नुवान तुषारा धुरा वाहताना दिसतील.
मुंबई इंडियन्स : ईशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नेहाल वढेरा, टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, पीयूष चावला, आकाश माधवल, नुवान तुषारा आणि जसप्रीत बुमराह.