समीर वानखेडे यांनी राखी सावंत आणि वकील अली काशिफ खान यांच्याविरोधात ११ लाख रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे.समीर वानखेडे यांनी आपल्या याचिकेत राखी आणि काशिफवर आपली बदनामी आणि सन्मान दुखावल्याचा आरोप केला आहे.
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक करून प्रसिद्धीच्या झोतात आलेले एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे पुन्हा चर्चेत आले आहे.समीर वानखेडे यांनी राखी सावंत आणि वकील अली काशिफ खान यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे.सोशल मीडियावर बदनामी केल्याचा आरोप करत समीर वानखेडे यांनी दिंडोशी शहर दिवाणी न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे.
राखी सावंत आणि अली काशिफ खान यांनी भविष्यात आपली बदनामी करण्याचा प्रयत्न करू नये, त्यासाठी त्यांना तसे निर्देश देण्यात यावे, अशी समीर वानखेडे यांनी आपल्या याचिकेमध्ये मागणी केली आहे.
हे ही वाचा:
मुस्लिम आता व्होट बँक राहिलेल्या नाहीत?
बदायूत दोन लहान सख्ख्या भावडांच्या हत्येनंतर वाद!
‘मला किंग म्हणून हाक मारू नका’
मजुरांच्या कुटुंबीयांना जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या रफिकचा हिंदूद्वेष जुनाच!
दरम्यान, समीर वानखेडे यांनी दाखल केलेल्या खटल्यावर वकील काशिफ यांनी प्रतिक्रिया दिली.ते म्हणाले की, ‘जेव्हा लोकहितासाठी सत्य बोलले जाते तेव्हा बदनामी होत नाही, असे कायद्यात म्हटले आहे. आयपीसीच्या कलम-४९९ मधील दुसरा अपवाद ‘लोकसेवकांच्या सार्वजनिक वर्तन’ बद्दल बोलतो. सार्वजनिक कार्ये पार पाडताना सार्वजनिक कर्मचाऱ्याच्या वागणुकीचा किंवा त्याच्या चारित्र्याचा आदर करून सद्भावनेने कोणतेही मत व्यक्त करणे ही बदनामी होत नाही.’
ते पुढे म्हणाले, आता हे प्रकरण न्यायालयात आहे, आम्ही त्यावर योग्य उत्तर देऊ.समीर यांनी आपले म्हणणे योग्य ठरवले तर मी त्यांना ११.०१ लाख रुपये देईन, असे वकील काशिफ यांनी म्हटले.दरम्यान, समीर वानखेडे यांनी केलेल्या ड्रग्ज कारवाईत मॉडेल मुनमुन धमेचा हिचा देखील समावेश होता आणि मॉडेल मुनमुन धमेचा हिचे वकील देखील अली काशिफ खान हेच होते.