बदायूत दोन सख्ख्या भावंडांच्या हत्येनंतर शहरातील नागरिक संतापले आहेत. नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिस दल आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहेत.बदायूमध्ये मंगळवारी संध्याकाळी साडेसहा वाजता कंत्राटदार विनोद ठाकूर यांची दोन मुले आयुष (१३) आणि अहान (६) यांची चाकूने गळा कापून हत्या करण्यात आली.
आरोपी दुसऱ्या समुदायाचा असल्याने नागरिक संतापले होते. संतप्त जमावाने चार दुकानांना आग लावली. त्यानंतर एक आरोपी साजिद शेखूपूर येथील जंगलात पोलिसांच्या चकमकीत मारला गेला. पोलिस या प्रकरणी साजिदचा भाऊ जावेद याचा शोध घेत असून हत्येचे कारणही तपासत आहेत.
कंत्राटदार विनोद हर घर जल योजनेंतर्गत उंच टाकीच्या निर्मितीचे काम करतात. तर, साजिद याचे सलून त्यांच्या घराच्या समोर आहे. विनोद यांची पत्नी संगीता त्यांच्या घराच्या खाली ब्युटी पार्लर चालवते. साजिदचे त्यांच्या घरी येणे-जाणे असे.
मंगळवारी संध्याकाळी संगीता ही तिची तिन्ही मुले आयुष, अहान आणि पियुष (८) यांच्यासोबत घरीच होती. साजिद संध्याकाळी सहा वाजता सलून बंद करून जावेदसह त्याच्या घरी आला तेव्हा संगीता त्यांच्यासाठी चहा बनवायला आत गेली. तेव्हा साजिद जावेदला तिथेच सोडून आयुष व अहानला गच्चीवर घेऊन गेला व पियुषला पाणी आणण्यास सांगितले.
हे ही वाचा:
‘मला किंग म्हणून हाक मारू नका’
मजुरांच्या कुटुंबीयांना जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या रफिकचा हिंदूद्वेष जुनाच!
सिद्दीक कप्पननेच कपिल मिश्रा, परवेश वर्मा यांना मारण्यासाठी पीएफआय हिट पथकाला निर्देश दिले
आयपीएलच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ‘ठोको ताली’
मात्र तो पाणी घेऊन वर पोहोचेपर्यंत साजिदने चाकूने आयुष व अहान याची चाकूने गळा चिरून हत्या केली होती. समोर आलेल्या पियुषवरही त्याने वार केले. तो किंचाळत खाली आला तर साजिदही त्याच्या मागोमाग केला. त्यानंतर संगीताने आरडाओरडा केला. जमाव जमेपर्यंत साजिद पळून गेला होता. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. पोलिस साजिदचा माग काढत असतानाच मुलांचे मृतदेह पाहून जमावाच्या संतापाचा कडेलोट झाला. संतप्त जमावाने साजिदच्या सलूनचे कुलूप तोडून सामान काढले आणि पेटवून दिले.
आसपासची तीन दुकानेही जमावाने पेटवून दिली. त्यानंतर जमाव एका धार्मिक स्थळावर पोहोचला. तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवले. त्यानंतर त्यांनी पोलिस चौकीसमोर घोषणाबाजी केली. पोलिस अधिकाऱ्यांनी जमावाची समजूत काढली. त्यानंतर परिसरात पोलिस आणि निमलष्करी दलाची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली. त्यानंतर काही वेळातच पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत साजिद मारला गेला. या चकमकीत एक पोलिसही जखमी झाला आहे. आरोपीने पोलिसांवर गोळीबार केला, त्याच्या प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपी मारला गेला.