मजुरांनी मोफत काम करण्यास नकार दिल्याने त्यांच्या झोपड्या कंत्राटदार मोहम्मद रफिक याने पेटूवन दिल्याची घटना गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील अंजर येथे रविवारी घडली होती. त्यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मजुरांचा अवघा संसार जळून खाक झाला होता. पोलिसांनी मोहम्मदला अटक केली असून तपासात या मोहम्मदचा हिंदूद्वेष जुना असल्याचे आणि त्याने तुरुंगवासही भोगला असल्याचे आढळून आले आहे.
कंत्राटदार आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. सन २००२च्या दंगलीत मोहम्मद रफिक आणि त्याच्या साथीदाराने मिळून अंजर येथील हनुमानाच्या मूर्तीची विटंबना केली होती. तसेच, त्याने मूर्तीच्या गळ्यात बूट बांधले होते. हिंदूधर्मियांच्या भावना दुखावल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर, सन २००२मधील दंगलीतील सहभागाप्रकरणी त्याला तीन वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागला होता. तेव्हा मोहम्मद अवघा १९ वर्षांचा होता. त्याने त्याच्या एका साथीदारासह हनुमानाला हिरव्या रंगाने रंगवल्याचे आढळून आले होते. पोलिसांनी दोघांनाही अटक करून न्यायालयासमोर सादर केले होते.
हे ही वाचा:
चकमक फेम माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्माला जन्मठेप
सर्फराज, ध्रुव जुरेलची कोटी उड्डाणे
टक्केवारीवाले यजमान चोरांचे स्नेहसंमेलन…
गरिबांचे धर्मांतर करण्याचा गाझियाबादमध्ये प्रकार
सन २००२च्या दंगलीतीतील सहभागाप्रकरणी त्याच्यावर विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले होते. दोन्ही आरोपींवर आरोपपत्र दाखल केल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. मात्र न्यायालयासमोर त्यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. हिंदू पक्षाच्या वतीने न्यायालयासमोर साक्षीदारांसह २८ पुरावे सादर करण्यात आले. २८ ऑगस्ट, २०१४ रोजी या संदर्भातील अंतिम सुनावणी झाली. तेव्हा न्यायालयाने रफिक याला दंगलीतील सहभागाप्रकरणी दोषी मानून तीन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. ही शिक्षा भोगून झाल्यानंतर सात वर्षांनी रफिक याने मजुरांची घरे जाळून आणखी एक गुन्हा केला.