२०२४ च्या आयपीएल लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला आपल्या ताफ्यात दाखल केले. हार्दिकच्या जागी कॅमेरून ग्रीन गुजरात संघात सामील झाला. काही दिवसानंतर बातमी आली की, मुंबई इंडियन्सचे नेतृत्व या सीझनमध्ये हार्दिक पंड्या करणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात पाचवेळा मुंबई इंडियन्स चॅम्पियन बनले आहे. त्याच रोहित शर्माला मुंबई इंडियन्सने तडकाफडकी कर्णधार पदावरून पायउतार केले गेले. त्यावरून सोशल मीडियावर जोरदार टीका करण्यात आली होती. आता हंगाम सुरू होण्याआधी संघाचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर यांना रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवण्याचा प्रश्न विचारण्यात आला, मात्र त्यांनी त्यावर मौन बाळगले.
हार्दिक पंड्या कर्णधार झाल्याची बातमी समोर येताच मुंबई इंडियन्स सोशल मीडियावर टीका करण्यात आली. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत हार्दिक पंड्या आणि मार्क बाउचर एकत्र बसले होते. दरम्यान, रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवण्याच्या प्रश्नावर प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी मौन बाळगले. त्यांनी या प्रश्नाचे उत्तर न देताच नकारार्थी डोके हलवले होते. बाऊचर यांच्या मौनामुळे हार्दिक आणि रोहित यांच्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा :
दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवरून कोर्टाकडून बाबा रामदेवांना हजर राहण्याचे आदेश!
मादी चित्ता गामिनीने पाच नव्हे सहा बछड्यांना दिला जन्म
केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांचा राजीनामा
नारायण मूर्ती यांच्याकडून चार महिन्यांच्या नातवाला २४० कोटी किमतीच्या शेअर्सची भेट
याच पत्रकार परिषदेत हार्दिक पंड्याने रोहित शर्मासोबतच्या मतभेदाच्या अफवांवरही मौन सोडले. रोहित शर्माकडून खूप काही शिकायला मिळाले असून रोहितने त्याला नेहमीच पाठिंबा दिला आहे. आपल्या कारकिर्दीतील निम्म्याहून अधिक काळ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली गेला असून तो त्याचा खूप आदर करतो, असेही हार्दिकने सांगितले.