सापाला पाळले की कधीतरी तो डसतोच, याचा प्रत्यय आता पाकिस्तानला येऊ लागला आहे. तालिबानने पाकिस्तानच्या अफगाणिस्तानमधील हवाई हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. तालिबानच्या सैन्याने डूरंड सीमेजवळ स्थित पाकिस्तानच्या लष्करी चौक्यांना उद्ध्वस्त केले आहे. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने या हल्ल्याला दुजोरा दिला आहे.
पाकिस्तानच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी तालिबानच्या सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानी लष्कराच्या केंद्रांना सशस्त्र लक्ष्य केल्याचे, अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयातर्फे सांगण्यात आले.
पाकिस्तानच्या हवाईहल्ल्यात आठ अफगाणिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तालिबानने सडेतोड कारवाई करून आमच्या सार्वभौमत्वाला आणि अखंडतेला धक्का लावण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा इशारा दिला होता.सोमवारी सकाळी सात वाजता डूरंड सीमेवर तालिबानी सैन्य आणि पाकिस्तानच्या सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांमध्ये चकमक उडाली होती. त्यानंतर पाकिस्तानच्या वतीने रॉकेट हल्ला करण्यात आला. त्यामुळे अफगाणिस्तानला दंडपाटन परिसरातून लोकांना येथील घरे रिकामी करण्यास सांगण्यात आले.
हे ही वाचा:
मोफत काम करण्यास नकार दिल्याने मजुरांच्या झोपड्या पेटवल्या!
तामिळनाडूत पीएमकेची ‘एनडीए’ला साथ; भाजपासोबत युती करून जागावाटप निश्चित
पोलीस दलाची मोठी कामगिरी; गडचिरोलीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा
जागावाटप मुद्द्यावरून मविआचा वंचितला अल्टिमेटम
त्यानंतर पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील खोस्त आणि पक्तिका प्रांतात हवाईहल्ले केले. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला. त्यानंतर पाकिस्तानी लढाऊ विमानांनी पुन्हा अफगाणिस्तानमध्ये घुसखोरी केली आमि पक्तिका प्रांतातील बरमेल जिल्हा आणि खोस्त प्रांतातील सेपेरा जिल्ह्यात बॉम्बवर्षाव केला. या हल्ल्यात महिला आणि मुलांसह आठ जणांचा मृत्यू झाला. अफगाणिस्तानने या हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
तर, अफगाणिस्तानमधील हा हल्ला तेथील दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी होता, असा दावा पाकिस्तान सरकारने केला आहे. तेथील हाफिज गुल बहाद्दूह समूहाच्या दहशतवाद्यांचा खात्मा करणे, हा या मोहिमेचा उद्देश असल्याचा दावा सरकारने केला आहे. तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान व हाफिज गुल बहाद्दूर या दहशतवादी संघटनांनी पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवादी हल्ले केले आहेत, असा दावा पाकिस्तान सरकारतर्फे करण्यात आला आहे.