महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीला रवाना झाले आहेत.याशिवाय महाराष्ट्रातील भाजपचे दिग्गज नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील दिल्लीला रवाना झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे भाजपच्या महायुतीत सामील होण्याबाबत चर्चा करण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत.राज ठाकरे यांच्यासह त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्यासह सचिन मोरे, हर्षल देशपांडे आणि राज ठाकरे यांचे मित्र हे चार्टड विमानाने दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आहे.
भाजप आणि मनसे पक्षांची युती होणार अशा बातम्या काही दिवसांपासून समोर येत होत्या.तशी चर्चा देखील चालू असल्याची माहिती होती.महत्त्वाचं म्हणजे गेल्या चार दिवसांमधील राज ठाकरे यांचा हा दिल्लीचा दौरा दुसरा आहे.दिल्लीमध्ये कोअर कमिटीची बैठक असल्याची माहिती आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस हे सुद्धा दिल्लीत असल्याची माहिती मिळत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेला महायुतीत घेण्यासाठी वरिष्ठ स्तरावर हालचाली सुरु असल्याची समोर दिसत आहे.जर ही बातचित सकारात्मक ठरली तर मनसे भाजपसोबत निवडणूक लढवेल.
हे ही वाचा:
“आयपीएलच्या आगामी हंगामात रोहित शर्मासोबत खेळण्यास उत्सुक”
“इंडी आघाडीतील नेत्यांची सभा म्हणजे ‘फॅमिली’ गॅदरिंग”
रमझानच्या दिवशी दुकान उघडे ठेवले म्हणून बांगलादेशात हिंदू व्यक्तीला मारहाण
हरवलेल्या दोन भावांचे मृतदेह आढळले मनपा पाण्याच्या टाकीत!
युती झाल्यानंतर भाजप मनसेसाठी किती जागा सोडेल हे देखील पाहणे तेवढेच महत्वाचं ठरणार आहे.कारण सध्या महायुतीमध्ये भाजपसोबत शिंदे-शिवसेना गट, राष्ट्रवादी अजित पवारगट सोबत आहे.आता यामध्ये मनसेला समाविष्ट केले तर जागा वाटपाचा तिढा कसा सुटणार हे पाहावे लागेल.
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांच्या पक्षासाठी महायुतीकडून दक्षिण मुंबईची जागा दिली जाण्याची शक्यता आहे. या ठिकाणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांना मनसेकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.राज ठाकरे यांनी याआधीच आपण यापुढे सत्तेत असू असे संकेत देण्यात आले आहेत. त्यानंतर सातत्याने राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठी होत आहेत. त्यामुळे राज ठाकरे आता महायुतीत सहभागी होणार हे स्पष्ट झाल्यासारखेच आहे.