पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराविरोधातील कठोर कारवाईसाठी ईडीचे कौतुक करत विरोधी पक्षांवर सडकून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) भ्रष्टाचाराविरुद्धच्या कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाईबद्दल कौतुक केले. तसेच, यावेळी त्यांनी विरोधी पक्षांनाही फटकारले. ‘त्यांना तपास संस्थांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल चिंता वाटते,’ अशी टीका मोदी यांनी केली. इंडिया टुडे परिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान मोदी यांनी ‘भ्रष्टाचाराबद्दल शून्य सहिष्णुता’ हा सरकारचा एक महत्त्वाचा पैलू असल्यावर जोर दिला. तसेच, भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई करण्यासाठी तपाससंस्था पूर्णपणे मुक्त आहेत, असे स्पष्ट केले.
तत्कालीन काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात अशा प्रकारांची अल्प प्रमाणात नोंद होत होती. तपास संस्थेला २०१४पूर्वी काम करण्याची परवानगी नव्हती. ‘ईडीबाबतच बोलायचे ठरवले तर, सन २०१४पर्यंत पीएमएलए अंतर्गत १८०० प्रकरणे नोंदवली गेली. मात्र गेल्या १० वर्षात चार हजार ७०० प्रकरणे नोंदवली गेली. सन २०१४पर्यंत केवळ पाच हजार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती, परंतु १० वर्षांत एक लाख कोटींहून अधिक किमतीच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत,’ असे ते म्हणाले. खटल्याच्या तक्रारीही १०पट वाढल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
जमीनदोस्त केलेल्या मशिदीच्या जागी नमाज अदा करण्यास उच्च न्यायालयाने नाकारली परवानगी!
हत्या झालेला पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या आईने लहान मुलाला दिला जन्म!
आरएसएसवर ख्रिश्चन समुदायाच्या निर्मूलनाचा बदनामीकारक आरोप ! दंड भरावा लागला
“भाजपा-एनडीए निवडणुकीसाठी तयार”
‘ईडीने दहशतवादी वित्तपुरवठा, सायबर गुन्हे आणि अंमली पदार्थांमध्ये गुंतलेल्या अनेकांना अटक केली आहे आणि मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांचा पर्दाफाश केला आहे आणि एकूण एक हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे,’ असे त्यांनी नमूद केले. जेव्हा अशा प्रकारचे अनुकरणीय कार्य घडते, तेव्हा काही लोकांसाठी समस्या निर्माण होणे स्वाभाविक आहे आणि त्याच कारणासाठी ते रात्रंदिवस मोदींना शिव्या घालण्यात मग्न आहेत, असे मोदी म्हणाले.
विरोधकांवर आणखी हल्लाबोल करताना ते म्हणाले, “या निवडणुकीत विरोधक कागदावर आकडेमोड करून स्वप्ने विणत आहेत, तर मोदी स्वप्नांच्या पलीकडे गॅरंटी देण्यापर्यंत पोहोचले आहेत, असे मोदी म्हणाले.