उत्तर प्रदेशातील मथुरामध्ये ‘लव्ह जिहाद’ची घटना उघडकीस आली आहे. रशिद नावाच्या एका मुस्लिम मुलाने स्वतःची खरी ओळख लपवून हिंदू मुलीला प्रेमपाशात ओढले. त्याने त्यासाठी स्वतःचे नाव अमन असल्याचे सांगून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिचा विश्वास संपादन करण्यासाठी तिला लग्नाचे आमिषही दाखवले. त्यानंतर तिच्याशी त्याने अनेकदा शारीरिक संबंधही प्रस्थापित केले. मात्र ती गर्भवती राहिल्याचे कळताच त्याने तिला सोडून दिल्याचे उघडकीस आले आहे.
मथुरामधील गोवर्धन भागात ही घटना घडली. राजस्थानमधील ही हिंदू तरुणी मथुरेत काम करत होती. रशिद हा देखील गोवर्धन भागात राहणारा आहे. तोही तिच्यासोबत काम करत होता. मात्र त्याने तो हिंदू असून त्याचे नाव अमन असल्याचे सांगितले होते. काही दिवसांनंतर त्याने तिला स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तो तिच्याशी लग्न करेल, असे खोटे वचनही दिले. त्यामुळे तिनेही त्याच्याशी अनेकदा शरीरसंबंध ठेवले. त्यादरम्यान ही तरुणी गर्भवती राहिली.
हे ही वाचा:
राष्ट्रीय स्वयंसेवक संलग्न सेवा भारती ट्रस्टवर ख्रिश्चन समुदायाच्या निर्मूलनाचा आरोप!
सर्वसामान्य माणसाच्या जीवनात सरकारचा हस्तक्षेप हवा कशाला? मी त्यांच्या जीवनातून सरकार बाहेर काढीन
“भाजपा-एनडीए निवडणुकीसाठी तयार”
राजकारण, ईव्हीएम आणि मुख्य निवडणूक आयुक्तांची शेरो शायरी
त्यामुळे ती त्याला लग्न करण्याची गळ घालू लागली. मात्र त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला आणि त्याचे खरे नावही उघड झाले. त्यानंतर रशिद तिला सोडून पळून गेला. त्यानंतर ही तरुणी हिंदू संघटनांच्या संपर्कात आली. त्यांनी तिला गोवर्धन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास मदत केली. त्यानंतर हिंदू संघटनेच्या सदस्यांनी त्याच्या भावाला अटक केली आणि पोलिसांना सुपूर्द केले. मुख्य आरोपी रशिद अजूनही फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विनोद बाबू मिश्रा यांनी दिली.
उत्तर प्रदेशातील आग्रामध्येही अशाच प्रकारची घटना उघडकीस आली होती. दिलशान नावाच्या मुस्लिम मुलाने स्वतःचे नाव दीपक कुमार असल्याचे सांगून अल्पवयीन हिंदू मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. जेव्हा या मुलीला सत्य परिस्थिती समजली तेव्हा या मुलीने निषेध करण्यास सुरुवात केली. मात्र त्यानंतर त्याने तिचा छळ करण्यास सुरुवात केली. अखेर या मुलीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपीने सलग चार वर्षे तिचा शारीरिक छळ केला. त्याने तिचा अश्लील व्हिडीओही बनवला होता. त्यानंतर त्याने तिला घरातून पैसे चोरण्यास सांगून तिला घेऊन पळ काढला. मात्र पोलिसांनी त्याला जेरबंद केले.