लोकसभा निवडणुकीआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुन्हा एकदा पाकव्याप्त काश्मीरचा उल्लेख केला. ‘पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे. तेथे राहणारे हिंदूही भारताचे आहेत आणि मुस्लिमही,’ असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी काँग्रेसलाही लक्ष्य केले. नागरिकता सुधारणा कायद्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष मुस्लिम समाजाची दिशाभूल करत आहेत. सीएएमध्ये नागरिकता काढून घेण्याची कोणतीही योजना नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शुक्रवारी नवी दिल्लीतील एका मुलाखतीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी याबाबतच्या काही माहितीवर प्रकाशझोत टाकला. ‘स्वातंत्र्याच्या वेळी पाकिस्तानमध्ये २३ टक्के हिंदू होते. आता मात्र ती संख्या २.७ टक्क्यांवर घसरली आहे. बाकीचे नागरिक कुठे आहेत? त्यांचे काय झाले? आज बांग्लादेशात १० टक्क्यांहून कमी हिंदू शिल्लक राहिले आहेत. ते कुठे गेले? त्यांच्यासोबत काय झाले? शेजारी देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर धर्मांतर झाले. तिथे त्यांच्या कुटुंबातील महिलांवर अन्याय झाला. त्यांच्या कुटुंबावर अत्याचार झाला. त्यांनी भारतामध्ये आश्रय घेतला. त्यांना नागरिकता का देता कामा नये?,’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
धर्माधारित फाळणी दुर्दैवी
या मुलाखतीत त्यांनी विरोधी पक्ष हे मुस्लिम समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला. सीएएमध्ये नागरिकत्व काढून घेण्याची कोणतीही तरतूद नाही. पाकिस्तानमधील अल्पसंख्याक समाजाच्या ज्या कुटुंबांना त्रास होत आहे, त्यांना फाळणीच्या वेळी आश्वासन दिले गेले होते की, ते नंतर भारतात येऊ शकतात. देशाने सन १९४७मध्ये धर्माच्या आधारावर फाळणी झाली, हे अतिशय दुर्दैवी होते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
हे ही वाचा:
लोकसभा निवडणुकीच्या तारखा उद्या होणार जाहीर!
मुंबईतील रस्ते कामाचा दहावीच्या विद्यार्थ्यांना फटका!
सर्वेक्षणानुसार एनडीए ४०० पार करणार!
आम्ही देशाची फाळणी होऊ दिली नसती
आम्ही कधीच फाळणीच्या बाजूने नव्हतो आणि निर्णायक स्थितीत असतो तर देशाची फाळणी करू शकलो नसतो. मुस्लिम पर्सनल कायद्याचे समर्थन करणारे धर्माच्या आधारित कायदा नसावा, असे बोलत आहेत. जितका अधिकार देशावर आमचा आणि तुमचा आहे, तितकाच शरणार्थींचाही आहे. पाकव्पाप्त काश्मीर आपले आहे आणि तेथील हिंदू-मुस्लिमही आपले आहेत,’असे शहा यांनी स्पष्ट केले.