27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषभारताने लसींसाठी उघडले दार

भारताने लसींसाठी उघडले दार

Google News Follow

Related

कोविडचा एकूणच वाढता प्रभाव लक्षात घेता, भारताने जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम राबवायला सुरूवात केली आहे. त्यासोबतच भारताचा लसोत्सव देखील चालू होता. या लसीकरण मोहिमेला बळकटी येण्याच्या दृष्टीने मोदी सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जगात इतरत्र वापरायला परवानगी मिळालेल्या कोविडवरील लसींना देखील परवानगी दिली आहे.

अमेरिका, ब्रिटन, युरोपियन महासंघ आणि जपान या देशांबरोबरच जागतिक आरोग्य संघटनेने मंजूरी दिलेल्या लसींना भारतात स्वतंत्र क्लिनीकल ट्रायल घेण्याची गरज यापुढे लागणार नाही. यांपैकी कोणत्याही एका देशाच्या संघटनेने परवानगी दिली असल्यास, त्या लसीचाय आपत्कालिन वापर सुरू होणार आहे.

हे ही वाचा:

अनिल देशमुखांची आज सीबीआय चौकशी

संचारबंदीच्या निर्णयाचे बुमरँग उलटले?

अजित पवारांनी तेरा साखर कारखाने घशात घातले

पार्सल मिळणार, पण नेणार कसे? 

सध्या भारतात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू आहे. सिरमच्या कोविशिल्ड आणि भारत बोयोटेकच्या कोवॅक्सिन या दोन लसींच्या सहाय्याने हे लसीकरण सुरू आहे. त्याचा वेग वाढावा, लसीकरणाला बळकटी यासाठी भारत सरकारने हा निर्णय घेतला आहे. या परदेशी वापरून लसीकरण करण्यात येणाऱ्या पहिल्या १०० लोकांवर सात दिवस बारीक लक्ष ठेवून त्यांच्यावर कोणतेही दुष्परिणाम होत नसल्याची खात्री करून घेऊन, मग त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात करता येणार आहे.

या नव्या नियमानुसार आधी क्लिनिकल ट्रायल घेऊन मग त्यांच्या आपत्कालिन वापरासाठी विनंती करण्या ऐवजी, लस बाजारात आणून एकाचवेळी लसीकरण आणि ट्रायल या दोन्ही गोष्टी करायला सरकारने परवानगी दिली आहे.

आयसीएमआरमधील शास्त्रज्ञ आणि साथरोग तज्ञ ललित कांत यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताला लहानमुलांच्या लसीकरणासाठी कोविशिल्डला पर्याय शोधावा लागणार आहे, कारण काही मुलांमध्ये या लसीने रक्ताच्या गुठळ्या निर्माण होऊ शकतात.

यामुळे फायझर, मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सनच्या भारतातील लसींचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु मंगळवारी अमेरिकेच्या औषध प्रशासनाने जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीवर रक्तात होणाऱ्या गुठळ्यांच्या मुद्द्यावरून बंदी घातली होती. फायझरने मागच्या वर्षी भारत सरकारकडे स्थानिक क्लिनीकल ट्रायल माफ करण्याची विनंती केली होती परंतु ती फेटाळण्यात आली होती. त्यामुळे या निर्णयाचा फायझरला मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे ही वाचा:

सिप्ला वाढवणार रेमडेसिवीरचे उत्पादन

मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेले पॅकेज म्हणजे निव्वळ धूळफेक आहे

आणखी काही मंत्र्यांचं बिंग फुटणार आहे. त्यांनाही राजीनामे द्यावे लागतील- मनोज कोटक

मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या तोंडाला पाने पुसली

संपूर्ण अमेरिकी सरकारच्या लसीकरणाचा भार फायझर, मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सन या लसींनी पेलला आहे. या लसींपैकी दोन डोस देणाऱ्या फायझर आणि मॉडर्ना अनुक्रमे ९५% आणि ९४% प्रभावी ठरल्या आहेत, तर एकच डोस देणारी जॉन्सन अँड जॉन्सनची लस ६६% परिणामकारक ठरली आहे.

जॉन्सन अँड जॉन्सनवर अमेरिकेने सध्या लादलेल्या बंदीमुळे ही कंपनी भारतात आपल्या लसीच्या वापरासाठी अर्ज करणार का याबाबत मात्र अजून स्पष्टता नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा