23.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषमुख्तार अन्सारीला जन्मठेपेची शिक्षा!

मुख्तार अन्सारीला जन्मठेपेची शिक्षा!

बनावट शस्त्र परवाना प्रकरणी न्यायालयाने सुनावली शिक्षा

Google News Follow

Related

मुख्तार अन्सारी याला वाराणसी न्यायालयाने बुधवारी(१३ मार्च) जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.१९९० मधील बनावट बंदूक परवाना प्रकरणी वाराणसीच्या खासदार/आमदार न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.तसेच २ लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.या प्रकरणी १९९७ मध्ये मुख्तार अन्सारीविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. मंगळवारी न्यायालयाने मुख्तार अन्सारी यांना दोषी ठरवले होते.आज त्यावर न्यायालयाकडून मुख्तार अन्सारी याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

बांदा कारागृहातून कैद असणारा मुख्तार अन्सारी याला कलम ४२८, ४६७, ४६८, आणि कलम – १२०बी कायद्यांतर्गत दोषी ठरवण्यात आले.खुनासह अनेक गुन्हे मुख्तार अन्सारीवर दाखल आहेत.मुख्तार अन्सारीने डबल-बॅरल बंदुकीच्या परवान्यासाठी गाझीपूरच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता.मात्र, त्याने जिल्हादंडाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांच्या बनावट सह्यांचा वापर करून शस्त्र परवाना काढला.या प्रकरणात तत्कालीन मुख्य सचिव आलोक रंजन आणि डीएमचे डीएम यांनीही साक्ष दिली.न्यायालयाने मंगळवारी मुख्तारला दोषी घोषित करत आज (१३ मार्च) जन्मठेपेची शिक्षा सुनावली.दरम्यान, आरोपी मुख्तार अन्सारी २०२१ पासून बांदा तुरुंगात बंद आहे.

हे ही वाचा:

सीएएला राज्यांचा विरोध निरुपयोगी; प्रक्रियेचा राज्यांशी संबंध कमी !

अहमदनगर आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर

पाकिस्तानचे झरदारी बिनपगारी!

काँग्रेसला रामराम करत पद्माकर वळवी यांचा भाजपात प्रवेश!

सात प्रकरणांमध्ये मुख्तार अन्सारीला शिक्षा
माफिया मुख्तार अन्सारीला आतापर्यंत सात प्रकरणांमध्ये शिक्षा झाली आहे. त्याला २१ सप्टेंबर २०२२ रोजी सरकारी कर्मचाऱ्याला धमकावल्याप्रकरणी तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. हजरतगंज पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या गँगस्टर ॲक्टच्या गुन्ह्यात त्याला २३ सप्टेंबर २०२२ रोजी दोन वर्षांच्या कारावासाची आणि १५ डिसेंबर २०२२ रोजी नोंदवलेल्या गँगस्टर ॲक्ट प्रकरणात दहा वर्षांची शिक्षा झाली. त्याला २९ एप्रिल २०२३ रोजी गँगस्टर कायद्यांतर्गत दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

आलमबाग पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या जेलरला धमकावल्याप्रकरणी त्याला सात वर्षांची शिक्षा आणि ५ जून २०२३ रोजी प्रसिद्ध अवधेश राय खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच रुंगटा कुटुंबाला १५ डिसेंबर २०२३ रोजी बॉम्बची धमकी दिल्याप्रकरणी पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा