काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे.मात्र, त्याआधीच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.नंदुरबारचे माजी पालकमंत्री आणि काँग्रेस नेते पद्माकर वळवी यांनी बुधवारी (१३ मार्च) भाजपात प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत पद्माकर वळवी यांनी कमळ हाती घेतले आहे.दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर पद्माकर वळवी यांनी पक्ष सोडल्याने नंदुरबारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
पद्माकर वळवी हे नंदुरबारमधील शहादा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार आहेत. पद्माकर वळवींनी राज्याच्या क्रीडा खात्याची धुरा सांभाळली आहे. ते मंत्री होते. नंदुरबार आणि उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसच्या बड्या चेहऱ्यापैकी एक म्हणून पद्माकर वळवींची ओळख आहे.नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही त्यांनी भूषवलं आहे.दरम्यान, पद्माकर वळवी हे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा दोन वर्षांपासून होती.मात्र, या सर्व चर्चा पद्माकर वळवी फेटाळून लावल्या होत्या.मात्र,पद्माकर वळवी यांनी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची काल भेट घेत आज पक्ष प्रवेश केला.पद्माकर वळवी यांच्या पक्षप्रवेशावेळी अशोक चव्हाण देखील उपस्थित होते.
हे ही वाचा:
संसद घुसखोर प्रकरण; भाजपचे खासदार प्रताप सिम्हा तिकिटाच्या प्रतीक्षेत!
रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएकडून एक संशयित ताब्यात
शाहजहान शेखचा शाळा सोडल्याचा दाखला बांगलादेशचा!
इंटरनेटवर ‘व्हॉट्स राँग विथ इंडिया?’ ट्रेंड!
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पद्माकर वळवी यांनी प्रतिक्रिया दिली.ते म्हणाले की, काँग्रेसमध्ये असताना मी काम केलं आहे.मात्र, भाजपच्या कामाची जी गती आहे, जे धोरण आहे, राज्याकडून आणि केंद्राकडून ज्या योजना आहेत त्या डायरेक्ट लोकांजवळ पोहचत आहेत आणि त्याचाच इफेक्ट देखील दिसत आहे.काँग्रेसच्या काळात देखील आदिवासींसाठी योजना होत्या.मात्र, प्रशासनाकडून आता ज्या पद्धतीने काम चालू आहे, त्याने आम्ही प्रभावित झालो आहोत.आता मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.पक्ष मला कोणतीही भुमिका देईल ती मी पार पाडेन, असे पद्माकर वळवी म्हणाले.