24.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषऑनलाइन ट्रोलिंगनंतर तरुणीने रेल्वेखाली स्वतःला झोकून दिले!

ऑनलाइन ट्रोलिंगनंतर तरुणीने रेल्वेखाली स्वतःला झोकून दिले!

मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश

Google News Follow

Related

ऑनलाइन ट्रोलिंगमुळे आंध्र प्रदेशात एका महिलेने आत्महत्या केली आहे.मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या बाजूने बोलल्याबद्दल विरोधी पक्ष टीडीपी आणि जनसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्या महिलेला सोशल मीडियावर ट्रोल केले.त्यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले, असा आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे.गीतांजली असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात तेनाली रेल्वे स्थानकाजवळ गीतांजली जखमी अवस्थेत सापडली होती.त्यानंतर उपचारादरम्यान सोमवारी(११ मार्च) तिचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोको पायलटच्या जबाबानुसार, तिने ट्रेनसमोर येऊन आत्महत्या केली.तिच्या संपूर्ण शरीरावर अनेक जखमा झाल्या होत्या.तिला उपचारासाठी गुंटूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तिच्यावर उपचार सुरु असताना तिचा सोमवारी मृत्यू झाला, असे पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे.

तपासात असे समोर आले की, गीतांजली एका कार्यक्रमात सहभागी झाली होती.त्यावेळी तिने स्थानिक माध्यमांना मुलाखत दिली.तिने दिलेली मुलाखत थोड्याच वेळात सोशल मीडियावर व्हायरल झाली.यानंतर तिला क्रूरपणे ट्रोल करण्यात आले, असे पोलीस अधीक्षक तुषार दुडी यांनी सांगितले.पोलीस अधीक्षक तुषार दुडी यांनी पुढे सांगितले की, कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार आणि रेल्वेच्या तपास अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार गुन्हा दाखल करत आहोत.

हे ही वाचा:

संसद घुसखोर प्रकरण; भाजपचे खासदार प्रताप सिम्हा तिकिटाच्या प्रतीक्षेत!

रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएकडून एक संशयित ताब्यात

शाहजहान शेखचा शाळा सोडल्याचा दाखला बांगलादेशचा!

इंटरनेटवर ‘व्हॉट्स राँग विथ इंडिया?’ ट्रेंड!

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी शोक वक्त केला.मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी, मृत गीतांजलीच्या कुटुंबीयांना तात्काळ मदत करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आणि २० लाख रुपयांची रक्कम जाहीर केली.तसेच गीतांजलीच्या मुलाखतीवर कथितपणे अनुचित टिप्पण्या पोस्ट करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

दरम्यान, गीतांजलीला ज्या ठिकाणी ट्रेनने धडक दिली त्या ठिकाणाहून टिपलेला व्हिडिओ टीडीपीने प्रसिद्ध केला आहे. गीतांजली यांची दोन अज्ञात व्यक्तींनी हत्या केल्याचे पक्षाने म्हटले आहे.टीडीपीचे म्हटले की, व्हिडिओमध्ये संभाषणाच्या आधारे दोन अज्ञात व्यक्तींनी गीतांजलीला धावत्या ट्रेनपुढे ढकलले आणि नंतर घटनास्थळावरून पळून गेले, ही सर्व घटना व्हिडिओमध्ये दिसत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा