लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी समोर आली आहे.यामध्ये राहुल गांधी वायनाडमधून तर शशी थरूर तिरुअनंतपुरममधून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.मात्र, अद्याप राहुल गांधी अमेठीमधून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट नाही.तसेच काँग्रेसचे अनेक बडे नेते आहेत ज्यांच्या नावाची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.अशी देखील चर्चा आहे की, कमलनाथ, अशोक गेहलोत यांसारखे अनेक बडे नेते निवडणुक लढवण्यास तयार नाहीयेत.काँग्रेसच्या सुत्रांनुसार, लोकसभा निवडणुकीसाठी अशोक गेहलोत आणि सचिन पायलट हे दोघेही राजस्थानमधून उभे राहणार नाहीत.
अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव जालोरमधून उभा राहण्याची शक्यता आहे.याशिवाय मध्यप्रदेशात काँग्रेसचे पूर्व मुख्यमंत्री कमलनाथ देखील निवडणुकीला उभे राहण्यास तयार नाहीयेत.त्यांच्या जागी मुलगा नकुलनाथ छिंदवाडा मधून उभा राहणार आहे.काँग्रेसच्या बड्या नेत्यांची निवडणुकीवर असलेली उदासीनता निकालावर परिणाम करू शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
हे ही वाचा..
जागावाटपावरून होणारी दिरंगाई चिंतेचा विषय
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचा राजीनामा!
काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; आमदार प्रतिभा धानोरकरांचा गौप्यस्फोट
गुंड आणि दहशतवाद्यांच्या संबंध प्रकरणी एनआयएकडून ३० ठिकाणी छापेमारी
या बड्या नेत्यांनी निवडणूक लढविल्या असत्या तर हे वातावरण तयार झाले नसते.विशेषतः बड्या नेत्यांनी अवघड जागेवर उभे राहून निवडणूक लढविली तर पक्षासाठी अनुकूल वातावरण निर्मिती तयार होण्यास मदत झाली असती.मात्र, नेत्यांच्या या भूमिकेमुळे पक्षाची चिंता वाढली आहे.
दरम्यान, सोमवारी काँग्रेस निवडणूक समितीची बैठक पार पडली.या बैठकीत आसाम, गुजरात, उत्तराखंड, राजस्थान आणि मध्यप्रदेशचा जागांवर चर्चा झाली.मात्र, राजस्थान, मध्यप्रदेश,गुजरात आणि उत्तराखंडमधून देखील काँग्रेसचे वरिष्ठ नेते निवडणुकीच्या मैदानात उतरण्यास इच्छुक नाहीयेत.