24.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरराजकारणउद्धव ठाकरे गटाला जबर धक्का, वायकर शिंदेंच्या गोटात

उद्धव ठाकरे गटाला जबर धक्का, वायकर शिंदेंच्या गोटात

विकासकामांसाठी शिंदे यांच्यासोबत गेल्याचे वायकरांचे स्पष्टीकरण

Google News Follow

Related

उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आमदार रवींद्र वायकर यांनी अखेर एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी रविवारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश घेतला. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर हा प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

या प्रवेशाबद्दल वायकर यांनी सांगितले की, आपल्या मतदारसंघातील विकासकामांसाठी आपण शिंदेंच्या नेतृत्वाखालील आलो आहे. खरे म्हणजे मी ५० वर्षे शिवसेनेत काम केले आहे. १९७४च्या जोगेश्वरीतील पहिल्या दंगलीपासून बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर मिळेल ते काम केले. कोविडच्या काळात कामे झाली नव्हती. पण मला आरेच्या रस्त्यासाठी १७३ कोटी हवेत. रॉयल पामसारख्या परिसरात पाण्याची उत्तम व्यवस्था हवी आहे. धोरणात्मक निर्णय लोकांसाठी बदलणे आवश्यक असते. तरच लोकांना न्याय देता येतो. आमच्याकडे असलेल्या पीएमजीबी कॉलनीतून इमारती पडल्या तर काय करायचे? सर्वोदयनगरचा प्रश्न आहे. देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांचे काम सुरू आहे. माझ्या मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यासाठी मी इथे प्रवेश घेतलेला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वायकर यांचे मोठा फुलांचा हार घालून स्वागत केले. त्यानंतर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, वायकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. वायकर यांनी गेली ४०-५० वर्षे बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहून शिवसेनेत काम केले आहे. ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण या बाळासाहेब यांच्या मंत्राप्रमाणे आम्ही काम केले.

हे ही वाचा:

किर्तीकरांच्या उमेदवारीवरून निरुपम यांच्याकडून उद्धव ठाकरे लक्ष्य !

ताठरपणा गेला, चेहऱ्यावर तणाव, सीबीआयच्या ताब्यात येताच शाहजहान शेखचे बदलले हावभाव!

न्या. ओक म्हणतात, दीप प्रज्वलन, पूजा नको… पण हे न्यायाला धरून आहे काय?

क्रिस्टिना पिस्कोव्हाने पटकावला ‘मिस वर्ल्ड २०२४’चा खिताब!

मुख्यमंत्री म्हणाले की, आज वायकर यांचे कुटुंब इथे उपस्थित आहे. त्यांचे मी स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशाचे नाव आदराने घेतले जात आहे. केंद्र सरकार आणि महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या माध्यमातून विकास होत आहे. या सगळ्या गोष्टींचा परिणाम वायकर यांच्यावर झाला आणि त्यानंतरच त्यांनी पक्षप्रवेश केला आहे.

वायकर आणि माझ्यात तिसऱ्या माणसाकड़ून संभ्रम

मुख्यमंत्र्यांनी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. माझ्यात आणि वायकर यांच्यात काही लोक संभ्रम निर्माण करत होते. पण आता एकत्र आल्यावर तो संभ्रम दूर झाला आहे. तिसरा माणूस हा संभ्रम निर्माण करत होता.

वायकरांची कारकीर्द

वायकर यांनी १९९२ साली पालिका निवडणूक लढविली आणि ते नगरसेवक झाले. २००६ ते २०१०मध्ये ते स्थायी समितीचे अध्यक्ष होते. २००९, २०१४ व २०१९ या कालावधीत ते आमदार होते. महायुती सरकारमध्ये ते उच्च व तंत्रशिक्षणाचे राज्यमंत्री होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा