23.4 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषदोन हजार कोटींचे ड्रग्ज; उदयनिधी स्टॅलिनना सात लाखांचा वाटा दिल्याचा आरोपीचा दावा

दोन हजार कोटींचे ड्रग्ज; उदयनिधी स्टॅलिनना सात लाखांचा वाटा दिल्याचा आरोपीचा दावा

उदयनिधी यांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार

Google News Follow

Related

अमलीपदार्थविरोधी पथक आणि दिल्ली पोलिसांनी सुमारे दोन हजार कोटी रुपये किमतीच्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणात द्रमुकचा माजी अधिकारी जाफर सादिक याला अटक केली आहे. जाफर एक चित्रपटनिर्माता आहे. त्याने अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. द्रमुकने नुकतेच जाफर याला पक्षातून निलंबित केले होते. सध्या त्याची चौकशी सुरू आहे. त्याने द्रमुकचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना सात लाख रुपये दिल्याचे या चौकशीत सांगितले आहे. त्याने गेल्या वर्षी आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर पाच लाख रुपये पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी उदयनिधी यांना दिले तर, दोन लाख रुपये पक्षनिधी म्हणून दिला, असे चौकशीत आढळले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांनाही चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. जाफरने उदयनिधी यांना खरोखरच पैसे दिले का? ते पैसे अमली पदार्थ तस्करीतील होते का?, याची चौकशी केली जाऊ शकते. ‘सादिकचे धागेदोरे तमिळ आणि हिंदू चित्रपटसृष्टीशीही जोडले गेले आहेत. काही ‘हाय प्रोफाइल’ लोकांसह राजकीय निधीसंबंधी काही प्रकरणांचीही चौकशी होऊ शकते, अशी माहिती एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी दिली. त्यामुळे लाखोंच्या व्यवहाराप्रकरणी द्रमुकच्या काही नेत्यांना चौकशीसाठी समन्स जाहीर केले जाऊ शकते.

हे ही वाचा:

हिंदूविरोधी प्रतिमा बदलण्यासाठी ममतांकडून रामनवमीला सार्वजनिक सुट्टी

भारत पेट्रोलियमची जेतेपदाची हॅटट्रिक

लग्नासाठी मुलगी पाहायला गेलेल्या कुटुंबावर काळाचा घात, कार अपघातात सहा जणांचा मृत्यू!

इयत्ता दुसरीतल्या मुलाला हृदयविकाराचा झटका?

अमली पदार्थ तस्करीप्रकरणी एनसीबीने फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत छापा मारला होता. त्यानंतर लगेचच सादिक लपला होता. त्याला अटक होईपर्यंत तो चेन्नईमधून थिरुवनंतपूरम, मुंबई, पुणे, अहमदाबाद आणि जयपूरमध्ये गेला होता. एनसीबीसीने अमली पदार्थ तस्करीशी सादिकचा संबंध जाहीर केल्यानंतर द्रमुकने त्याची पक्षातून हकालपट्टी केली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा