उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका शाळेत शनिवारी दुपारी इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्याचा अचानक खेळता खेळता मृत्यू झाला. घटनेनंतर मुलाचे नातेवाईक संतप्त झाले होते. त्यांनी शाळा प्रशासनावर आरोपही केला. या मुलाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा, असे सांगितले जात आहे. सध्या त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
हिमायुंपूरमध्ये राहणारे धनपाल यांचा आठ वर्षांचा मुलगा चंद्रकात जवळच्या शाळेत इयत्ता दुसरीत शिकत होता. तो शनिवारी नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता. दुपारच्या वेळेत जेवण झाल्यानंतर तो खेळता खेळता अचानक जमिनीवर कोसळला. लगेचच त्याचे मित्र त्याच्याभोवती जमा झाले. शिक्षकांनीही धाव घेतली. त्यानंतर त्याला लगेचच रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले. तो दुपारच्या मधल्या सुट्टीत जेवला आणि त्यानंतर तो खेळला.
हे ही वाचा:
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल!
मनी लाँड्रिंग प्रकरणी छापा टाकत लालू यादव यांच्या निकटवर्तीयाला अटक!
‘सन २०१८मध्ये एनडीएशी फारकतीचे कारण केवळ राजकीय’
पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच रामनवमीला सुट्टी!
खेळून झाल्यानंतर तो त्याच्या वर्गात जात होता. तेव्हा अचानक तो जमिनीवर कोसळला, असे एका शिक्षकाने सांगितले. या घटनेनंतर मुलाचे नातेवाईक संतापले होते. त्यांनी मुलाच्या मृत्यूसाठी शाळा व्यवस्थापनाला दोषी ठरवले आहे. अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आली. तर, त्यांच्या मुलाला कोणताही आजार नव्हता. तो पूर्णपणे निरोगी होता, असे या मुलाच्या वडिलांचे म्हणणे आहे.
मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या अहवालानुसार, पुढील कारवाई केली जाईल. ही पूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. काही जणांच्या मते धावताना मुलाचा मृत्यू झाला. अन्य मित्रांनीही या दाव्याला दुजारो दिला आहे.