27 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरविशेषमहाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ

Google News Follow

Related

महाराष्ट्रात कोरोनाचा वेग प्रचंड वाढला असून, फेब्रुवारीपासून होत असलेल्या रुग्णवाढीने मंगळवारी नवा उच्चांक नोंदवला आहे. राज्यात २४ तासांत पहिल्यांदाच तब्बल ६०,२१२ रुग्ण आढळून आले असून, २८१ रुग्णांना जीव गमावावा लागला आहे.

राज्यात आज  ६०,२१२   कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आणि आज नवीन ३१, ६२४ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण २,८६,६९७ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ५, ९३, ०४२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

आज राज्यात २८१ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळं एकूण ५८,८५२ लोकांचा बळी गेला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८१.४४% झाले आहे. तर पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात १०,११२ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून तब्बल ९९ बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा:

पुढील पंधरा दिवस काय सुरु काय बंद? वाचा सविस्तर

फुटकळ पॅकेज देऊन मागील दाराने लॉकडाउन

योगी आदित्यनाथ विलगीकरणात

मोरीच्छपी हत्याकांड: बंगालच्या राजकारणातील जातीयता

राज्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत आहे. याच पार्श्वूभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कडक निर्बंध लागू केले आहे आहे. राज्यात उद्या रात्री ८ वाजल्यापासून १४४ कलम लागू करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे आहे. आवश्यक कामाशिवाय कुणालाही बाहेर फिरता येणार नाही. पुढीस १५ दिवसांसाठी ही संचारबंदी लागू असणार आहे. मंगळवेढा- पंढरपूरमध्ये पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे मतदान झाल्यावर निर्बंध लागू होतील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. संचारबंदीच्या काळात आवश्यक सेवा वगळून इतर सेवा बंद राहतील. सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. लोकल, बस अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरु राहतील. जनावरांचे दवाखाने सुरु राहतील. पावसाळी पूर्व कामं सर्व सूरू राहतील. हॉटेल्स, रेस्टॉरंट टेक अवे सुरुच राहणार, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
197,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा