23.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषखलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा व्हिडिओ समोर

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा व्हिडिओ समोर

Google News Follow

Related

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येचे व्हिडिओ फुटेज कॅनडातील गुरुद्वाराबाहेर सशस्त्र व्यक्तींनी गोळ्या घालून ठार केल्याच्या नऊ महिन्यांनंतर समोर आल्याचे सीबीसी न्यूजने म्हटले आहे. २०२० मध्ये भारताने दहशतवादी म्हणून नियुक्त केलेल्या निज्जरची १८ जून २०२३ रोजी संध्याकाळी ब्रिटिश कोलंबियामधील सरे येथील गुरुद्वाराबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. सीबीसी न्यूजने हा व्हिडिओ ‘द फिफ्थ इस्टेट’ या कॅनेडियन तपासात्मक माहितीपट मालिकेतून मिळवला आहे. हा व्हीडीओ सीबीसी नेटवर्कवर प्रसारित करण्यात आला आहे. सीबीसी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, फुटेजची एकाहून अधिक स्त्रोतांकडून पडताळणी करण्यात आली आहे.

हेही वाचा..

मालदीवचे माजी राष्ट्रपती नशीद यांनी भारताची मागितली माफी

राहुल गांधी पुन्हा वायनाडमधूनच लढणार

व्हिडिओमध्ये निज्जर त्याच्या राखाडी डॉज राम पिकअप ट्रकमधून गुरुद्वाराच्या पार्किंगमधून बाहेर पडताना दिसत आहे. त्यानंतर दोन माणसे ट्रककडे धावतात आणि चंदेरी टोयोटामध्ये घटनास्थळावरून पळून जाण्यापूर्वी निज्जरला गोळ्या घातल्या जात असल्यचे वृत्त सीबीसी न्यूजने दिले आहे. ही घटना घडली तेव्हा तेथे असलेल्या जवळच्याच एका मैदानात फुटबॉल खेळत असलेल्या दोघांनी सांगितले की, गोळीबार झाल्यानंतर आम्ही घटनास्थळी धावलो आणि हल्लेखोरांचा पाठलाग केला. यातील भूपिंदरसिंग सिद्धू याने द फिफ्थ इस्टेटला सांगितले की त्यांनी दोन लोक पळताना पाहिले. आम्ही त्या दिशेने पळू लागलो. जिथून आवाज येत होता.तो म्हणाला, घटनास्थळी पडलेल्या निज्जरची छाती दबावण्याचा प्रयत्न केला आणि तो श्वास घेत आहे की नाही याची खात्री केली. त्याला हलवलेसुद्धा असे त्याने सांगितले. मात्र तो त्यावेळी बेशुद्ध पडला होता, असे त्याने सांगितले आहे.

टोयोटामध्ये चढेपर्यंत मलकित सिंगने हल्लेखोरांचा पाठलाग केला. मात्र ते घटनास्थळावरून निसटण्यात यशस्वी झाले. रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिस (आरसीएमपी) ने अद्याप निज्जर हत्येतील कोणत्याही संशयिताचे नाव घेतलेले नाही किंवा कोणाला अद्याप अटक सुद्धा केली नसल्याचे वृत्त सीबीसी न्यूजने दिले आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी या घटनेत भारताचा हात असल्याचा आरोप केल्यानंतर हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमुळे भारत आणि कॅनडा यांच्यात मोठ्या राजनैतिक वादाला तोंड फुटले होते. कॅनडाच्या भूमीवर निज्जरच्या हत्येत भारत सरकारचे एजंट सामील असल्याचा दावा ट्रूडो यांनी केला. भारताने हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा