23.4 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषपहिला सांगितले असते तर इंडी आघाडीत सामील झालोच नसतो!

पहिला सांगितले असते तर इंडी आघाडीत सामील झालोच नसतो!

काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचे वक्तव्य

Google News Follow

Related

भाजप विरोधी तयार करण्यात आलेल्या ‘इंडी’ आघाडीमध्ये दिवसेंदिवस बिघाड होताना दिसत आहे.लोकसभेच्या तोंडावर इंडी आघाडीमधून बरेच पक्ष हात वर करत बाहेर पडत आहेत.याच मालिकेत नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी इंडिया आघाडीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.ते म्हणाले की, मला इंडिया आघाडीत सहभागी होण्याआधीच सांगितलं असत तर मी कधीच इंडिया आघाडीत सहभागी झालो नसतो.

इंडिया आघाडीतील पीडीपी पक्षावर अब्दुल्ला हे नाराज असल्याचे बोलले जात आहे.पीडीपीला दिल्या जाणाऱ्या जागेवर ते नाराज आहेत.अब्दुल्लांच्या मते पीडीपीला त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त जागा दिल्या जात आहेत. यावर ओमर अब्दुल्ला म्हणाले की, मी प्रसारमाध्यमांना यापूर्वीच सांगितलं होतं की, जो पक्ष मागच्या निवडणुकीत ज्या-ज्या मतदारसंघांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर होता, त्यांना ती जागा मागण्याचा अधिकारच नाही.

हे ही वाचा:

रोहित-शुभमनच्या शतकांनी अनेक विक्रम मोडित

महाशिवरात्रीच्या मिरवणुकीत विजेचा धक्का लागून १४ मुले जखमी!

“ठाकरेंनी गडकरींना ऑफर देणं म्हणजे गल्लीतल्या व्यक्तीने अमेरिकेचा राष्ट्रपती करतो हे सांगण्यासारखं”

सत्ताबदलानंतर भारत आणि तालिबान यांच्यात प्रथमच बैठक!

मला इंडिया आघाडीत सहभागी होण्याआधीच माहिती असतं की आम्हाला आघाडीतल्या इतर सदस्यांसाठी स्वतःला कमकुवत करावं लागणार आहे तर मी कधीच इंडिया आघाडीत सहभागी झालो नसतो, असे अब्दुल्ला म्हणाले.ओमर अब्दुल्ला पुढे म्हणाले की, जो पर्यंत जागेचा प्रश्न आहे आम्ही हे स्प्ष्ट करतो की, आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू.

दरम्यान, नितीश कुमार यांच्या जनता दलाने (युनायटेड) भाजपाबरोबर सरकार स्थापन करून इंडी आघाडीला पहिला धक्का दिला.नितीश कुमार यांच्या पाठीला पाठ लावत ममता बॅनर्जी देखील पुढे आल्या.त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसशी जागावाटपावरून मतभेद असल्याचे उघड केले. यानंतर आता जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स या पक्षानेही स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा