24 C
Mumbai
Thursday, January 2, 2025
घरविशेषमहिला झाल्या सबल, देशाची वाढली ताकद!

महिला झाल्या सबल, देशाची वाढली ताकद!

संसदेपासून लष्करापर्यंत प्रत्येक क्षेत्रात महिलांचे प्रमाण वाढते

Google News Follow

Related

भारतात राजकारण, उद्योग-अर्थव्यवस्था, शिक्षण, नोकरशाही आणि लष्करात महिलांचा वाटा लक्षणीयरीत्या वाढतो आहे. देशातील अनेक क्षेत्रांत महिला लक्षणीय कामगिरी करत आहेत. मात्र काही क्षेत्रांत अजूनही खूप मोठा पल्ला गाठायचा आहे.

राजकारण : सन १९५१मध्ये जेव्हा लोकसभेची पहिली निवडणूक झाली, तेव्हा केवळ २२ महिला खासदार होत्या. म्हणजे केवळ पाच टक्के. आता महिला खासदारांची संख्या ७८ आहे. सप्टेंबर, २०२३मध्ये संसदेने महिलांना लोकसभेत ३३ टक्के आरक्षणाचे विधेयक मंजूर केले आहे. त्यामुळे येथे महिलांची संख्या आणखी वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

संरक्षण :
लष्कर – जानेवारी २०२३पर्यंत, मेडिकल आणि डेंटल क्षेत्रासह एक हजार ७३३ महिला लष्कर अधिकारी व १०० अन्य रँकचे अधिकारी तैनात होते. जुलै, २०२३च्या आकडेवारीनुसार, लष्करातील वैद्यकीय भागात एक हजार २१२, डेंटलमध्ये १६८ आणि मिलिट्री नर्सिंग सेवेत तीन हजार ८४१ महिला सैनिक व अधिकारी नियुक्त होत्या.

नौदल – जुलै, २०२३पर्यंत मेडिकल व डेंटल अधिकाऱ्यांसह ५८० महिला नौसैनिक तैनात होत्या. ७२६ अग्निवीरांची भर्ती केली गेली. येथे मेडिकलच्या १५१, डेंटलच्या १० व नर्सिंग सेवेच्या ३८० महिला तैनात आहेत.

हवाई दल – जुलै, २०२३पर्यंत मेडिकल व डेंटल शाखांशिवाय एक हजार ६५४ महिला हवाई दल अधिकारीही तैनात होते. १५५ अग्निवीर हवाई सैनिकांचीही नियुक्ती करण्यात आली होती. मेडिकलमध्ये २७४, डेंटलमध्ये पाच आणि नर्सिंगमध्ये ४२५ महिला हवाई दल सैनिकांची नियुक्ती केली गेली.

हे ही वाचा :

इंग्लंडची निराशाजनक कामगिरी पाहून नासिर हुसैन संतापले!

१५० उमेदवारांची नावे निश्चित होणार; दुसरी यादी १० मार्चला जाहीर होण्याची शक्यता

राहुल गांधी यांची वायनाडमधून उमेदवारी जवळपास निश्चित

नूंह येथील बोर्डाच्या परीक्षेत कॉपी; शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांचा छापा

वैद्यकीय: सन २०२१मधील ऑल इंडिया सर्वे ऑफ हायर एज्युकेशन संस्थेचा दावा आहे की, सन २०१२मध्ये मेडिकल व अन्य चिकित्सेसंबंधी अभ्यासक्रमात ६३.४१ टक्के विद्यार्थिनी होत्या. सन २०२०मध्ये ही संख्या ६६.८४वर पोहोचली. नर्सिंगमध्ये ८० टक्के महिला आहेत. ज्या या क्षेत्रातील महिलांची कार्यकुशलता सिद्ध करतात.

शिक्षण : युनेस्कोनुसार, १९५१मध्ये महिला शिक्षकांची संख्या अवघी ८२ हजार होती. सन २०२२मधील युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन (युडीआयएसई)च्या अहवालानुसार, ही संख्या ४८.७५ लाखांपेक्षा अधिक झाली आहे. भारतात सन १९५१मध्ये महिला साक्षरतेचे प्रमाण ८.८६ टक्के होते, ते सन २०११मध्ये ६५.४६ झाले आहे.

उद्योग : एका खासगी संस्थेच्या सर्वेक्षणानुसार, सन २०२२-२३मध्ये भारतीय उद्योग क्षेत्रात केवळ आठ टक्के महिला सीईओ आहेत. वरिष्ठ प्रबंधक पदांवरील महिलांचे प्रमाण ३२ टक्के आहे.

नोकरशाही : सन १९७०मध्ये देशात एकूण आयएएस अधिकाऱ्यांपैकी नऊ टक्के महिला होत्या. सन २०२०पर्यंत ही संख्या २१ टक्क्यांवर पोहोचली. सन १९५१ ते २०२०च्या आकडेवारीनुसार, एकूण ११ हजार ५६९ आयएएस अधिकारी तैनात केले गेले, त्यातील एक हजार ५२७ महिला होत्या. जानेवारी, २०२२मध्ये सचिवस्तरावर ९२पदांपैकी केवळ १३ महिलांची नियुक्ती होती. ३६ राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये डिसेंबर, २०२१मध्ये केवळ दोन मुख्य सचिव महिला होत्या.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा