24.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषकाश्मीरच्या नाझीमने पंतप्रधान मोदींसोबत काढला सेल्फी, मोदीही म्हणाले माझा मित्र नाझीम!

काश्मीरच्या नाझीमने पंतप्रधान मोदींसोबत काढला सेल्फी, मोदीही म्हणाले माझा मित्र नाझीम!

पंतप्रधान मोदींनी सेल्फी काढत सोशल मीडियावर केला शेअर

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत.जम्मू-काश्मीर मधून कलम-३७० हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा पहिला दौरा आहे.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बक्षी स्टेडियमवर विकसित भारताच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.नाझीम नावाच्या लाभार्थीशी ते बोलत असताना नाझीमने पीएम मोदींसोबत सेल्फी घेण्याची इच्छा व्यक्त केली. पीएम मोदींनी या तरुणाची इच्छा पूर्ण केली आणि हा सेल्फीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला.

जेव्हा नाझिमने पीएम मोदींना सेल्फीसाठी विचारले तेव्हा त्यांनी उत्तर दिले, “नक्की, मी एसपीजी टीमला तुम्हाला माझ्याकडे आणण्यास सांगेन. नक्कीच एकत्र सेल्फी घेईन.” सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर पोस्ट शेअर करताना पीएम मोदी म्हणाले, “माझा मित्र नाझिमसोबतचा एक संस्मरणीय सेल्फी. त्याच्या चांगल्या कामाने मी प्रभावित झालो. जाहीर सभेत त्याने सेल्फीची विनंती केली आणि त्याला भेटून आनंद झाला. त्याच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा.”

हे ही वाचा :

रोहतकची जागा अभिनेता रणदीप हुड्डाला?

बेंगळुरूत पाण्याची भीषण टंचाई

उत्तर प्रदेशात सपाला आणखी एक धक्का बसणार!

रशियाच्या मिसाईलपासून झेलेन्स्की थोडक्यात बचावले

वास्तविक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सेल्फी घेणारा नाझीम हा विकास भारत कार्यक्रमाचा लाभार्थी आहे आणि विकास भारत विकास जम्मू-काश्मीर कार्यक्रमादरम्यान त्याने पंतप्रधान मोदींशी संवाद साधला.या संवादादरम्यान नाझीम याने स्वतः एक मध विक्रेता असल्याचे पंतप्रधान मोदींना सांगितले.त्याचा पूर्व प्रवास त्याने पंतप्रधान मोदींना सांगितला.

नाझीमने पंतप्रधान मोदींशी संवाद साधताना सांगितले की, मी मधमाशांपासून मध काढण्याचे काम करतो. मी ५ हजार किलो मध विकला आहे. याचा फायदा मी एकटाच घेणार नाही, तर माझ्यासोबत इतर तरुणांनाही सामील करून घेईन, असे मला वाटले. हळूहळू जवळपास १०० लोक माझ्यात सामील झाले. आम्हाला २०२३ मध्ये एफपीओ मिळाला आणि त्यानंतर कोणतीही चिंता नाही. आम्हीही देशासोबत पुढे गेलो आहोत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा