25 C
Mumbai
Tuesday, November 19, 2024
घरविशेष२०२३ च्या तुलनेत पंतप्रधान मोदींच्या अप्रूवल रेटिंगमध्ये १० टक्क्यांनी वाढ

२०२३ च्या तुलनेत पंतप्रधान मोदींच्या अप्रूवल रेटिंगमध्ये १० टक्क्यांनी वाढ

अप्रूवल रेटिंग सर्वे करणाऱ्या ‘इप्सोस इंडियाबस’कडून शिक्कामोर्तब

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ख्याती जगभरात असून ते जागतिक नेत्यांच्या यादीमध्ये अव्वल स्थानी आहेत. केवळ देशातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेच आलेख दिवसेंदिवस वर जातानाचं दिसत आहे. अशातच नरेंद्र मोदी यांच्या अप्रुवल रेटिंगमध्येही (मान्यता प्राप्त नेता) कमालीची वाढ झाली आहे. अप्रूवल रेटिंग सर्वे करणाऱ्या ‘इप्सोस इंडियाबस’ या संस्थेने यावर शिक्कामोर्तब केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अप्रूवल रेटिंमध्ये मोठी वाढ झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये ७५ टक्के अप्रूवल रेटिंग मिळवली आहे. विशेष म्हणजे डिसेंबर २०२३ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ६५ टक्के अप्रूवल रेटिंग मिळाली होती म्हणजेच आता १० टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे निवडणुका जवळ आलेल्या असताना लोकांचा कल नरेंद्र मोदींच्याच बाजूने असल्याचं चित्र आहे.

२०२२ मध्ये पंतप्रधान मोदी यांना ६० टक्के अप्रूवल रेटिंग होती. फेब्रुवारी २०२३ मध्ये त्यांना ६७ टक्के अप्रूवल रेटिंग मिळाली होती. डिसेंबर २०२३ मध्ये त्यांच्या अप्रूवल रेटिंगमध्ये २ टक्क्यांनी घट झाली होती. पण, त्यांनी पुन्हा एकदा मोठी मजल मारली आहे. २०२४ मध्ये त्यांचे अप्रूवल रेटिंग वाढले आहे.

हे ही वाचा :

‘मेटा’ ठप्प झाल्यामुळे कंपनीला १०० मिलियन डॉलर्सचं नुकसान

नक्षलवाद्यांशी संबंध प्रकरणात जी एन साईबाबा निर्दोष

बलात्कार पीडित स्पॅनिश महिलेच्या पतीला १० लाखांची भरपाई

पंतप्रधान मोदींच्या मशालीने मुस्लिमांमध्ये पसरलेला अंधार दूर करेन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये देशात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. भारतात जी-२० परिषद आयोजित करण्यात आली होती. भारताचे चांद्रयान यशस्वी चंद्रावर पोहचले. जगातील प्रमुख देशांसोबत भारताने महत्त्वाचे करार केले आहेत. शिवाय, अनेक देशांसोबत भारताचे संबंध सुधारले आहेत. आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया या उपक्रमांना मिळत असलेले पाठबळ, संयुक्त अरब अमिरातीमध्ये हिंदू मंदिराचे निर्माण, राम मंदिर निर्माण अशा अनेक धाडसी आणि जनहिताच्या निर्णयांमुळेचं नरेंद्र मोदी यांची रेटिंग वाढल्याचे बोलले जात आहे.

वयोगटानुसार देण्यात आलेले रेटिंग

  • ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे व्यक्ती- ७९ टक्के
  • १८ ते ३० वयोगटातील व्यक्ती -७५ टक्के
  • ३१ ते ४५ वयोगटातील व्यक्ती -७१ टक्के
  • महिला- ७५ टक्के
  • पुरुष- ७४ टक्के

भागानुसार देण्यात आलेले रेटिंग

  • उत्तर भारत- ९२ टक्के
  • पूर्व भारत- ८४ टक्के
  • पश्चिमी भारत-८० टक्के
  • दक्षिण भारत -३५ टक्के
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
192,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा