23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारण"५० वर्षे पवारांचे ओझे महाराष्ट्र वाहतो आहे"

“५० वर्षे पवारांचे ओझे महाराष्ट्र वाहतो आहे”

जळगावच्या सभेत अमित शहा यांनी फुंकले रणशिंग

Google News Follow

Related

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी जळगावमध्ये युवा संवाद कार्यक्रमात तरुणांशी संवाद साधला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अमित शाह यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यात अमित शाह यांची जळगावमध्ये जाहीर सभा पार पडली. यावेळी बोलताना अमित शाह यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत विरोधकांवर जबरदस्त निशाणा साधला.

महाविकास आघाडीच्या ऑटोची तिन्ही चाकं पंक्चर

यावेळी अमित शाह यांनी शरद पवार यांनाही टोला लगावला. शरद पवार ५० वर्षांपासून राज्यातील जनता तुम्हाला सहन करते आहे. “शरद पवार मोदींना १० वर्ष झाले पण तुम्हाला महाराष्ट्राची जनता ५० वर्ष सहन करत आहे. ५० वर्ष सोडा जनतेला ५ वर्षांचा हिशोब द्या. मी तर १० वर्षाचा हिशोब द्यायला तयार आहे,” असा पलटवार अमित शाह यांनी केला आहे. तिसऱ्या वेळी मोदींना ४०० पार खासदार नेण्यासाठी समर्थन करा, असा खोचक सल्ला अमित शाह यांनी शरद पवारांना दिला. राज्यात तीन चाकी महाविकास आघाडीच्या ऑटोची तिन्ही चाकं पंक्चर झाली आहेत. सध्या एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकार चांगले काम करत आहे, असं म्हणत अमित शाह यांनी महायुती सरकारच्या कामाबद्दल गौरवोद्गार काढले.

२०२४ मधील मतदान हे २०२७ मध्ये भारताला विकसित बनविण्यासाठी

आगामी निवडणूक म्हणजेच २०२४ मधील निवडणुकीसंदर्भात बोलणार असल्याचे म्हणत अमित शाह यांनी सांगितले की, “शिवाजी महाराजांनी स्वकीय भावना निर्माण केली. देश आज जो उभा आहे त्याची पायभरणी शिवाजी महाराजांनी केली. आगामी निवडणुकीतील मतदान हे नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी आहे या गैरसमाजात राहू नका. २०२७ ला विकसित भारत बनविण्यासाठी हे मतदान आहे. भविष्यासाठी मतदान आहे, युवकांच्या भविष्यासाठी मतदान आहे,” असा सल्ला अमित शाह यांनी तरुण पिढीला दिला आहे.

परिवारवादी पक्ष देशात लोकशाही टिकवून ठेवतील का?

अमित शाह यांनी जळगावच्या सभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून विरोधकांना खडेबोल सुनावले. “येणारी लोकसभा ही आत्मनिर्भर भारत बनवण्याची निवडणूक आहे. आपल्यासमोर इतर जे पक्ष आहेत ते सर्व परिवारवादी पक्ष आहेत. हे सर्व आपल्या मुलांना पंतप्रधान बनवण्याच्या मागे लागले आहेत. उद्धव ठाकरेंना मुलगा आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं आहे, शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री बनवायचे आहे. सोनिया गांधींना राहुल गांधी यांना पंतप्रधान पदी बसवायचे आहे. सोनिया गांधी तिसऱ्यावेळी राहुल बाबाला लॉन्च करण्याचा प्रयत्न करत आहेत. २०१९ ते मध्ये लॉन्च झाले नाहीत. या पक्षांमध्ये लोकशाही नाही या सर्व परिवारवादाच्या पार्टी आहेत. या सर्व राजकीय पार्टी देशात लोकशाही ठेवू शकतील का? त्यांना त्यांच्या मुला-मुलींना मुख्यमंत्री बनवायचं आहे जनतेसाठी त्यांच्याकडे काहीही नाही,” अशी घाणाघाती टीका अमित शाह यांनी विरोधकांवर केली आहे.

नरेंद्र मोदींच्या हाती तिसऱ्या वेळी सत्ता द्या, भारत जगाच्या अर्थव्यवस्थेत तिसऱ्या नंबरवर झेप घेईल. मोदी गॅरंटी देण्यासाठी आलो आहे. तुम्ही नोकरीला जाणार तिथे तुमचा बायोडाटा बघितला जाणार की नाही? मग पंतप्रधान बनविताना तुम्ही बायोडाटा बघायला हवा, असा सल्ला यावेळी अमित शाह यांनी तरुणांना दिला.

काँग्रेसने मतासाठी रामलल्लाला तंबूत ठेवले

“नरेंद्र मोदींकडे १० वर्षांचा अनुभव आणि पुढील २५ वर्षांचे व्हिजन आहे, असा नेता पुन्हा पुन्हा होणे नाही. मुद्रा लोन दिले, स्टार्टअप दिले, डिजीटल व्यवहार झाले, रेल्वे ट्रॅक बनविले, रोज गॅस सिलेंडर ५० हजार लोकांना दिले, गरिबीतून लोकांना बाहेर काढले. नळाला पाणी आले. उरी, पुलवामामध्ये आतंकवादी आले तेव्हा १० दिवसांत पाकिस्तानमध्ये जाऊन सर्जिकल स्टाईक केले. ही मोदी गॅरंटी आहे. काश्मीर आपला हिस्सा आहे की नाही? ३७० कलम ७० वर्ष काँग्रेसने हटविले नाही. मोदींना दोनदा पंतप्रधान केले त्यांनी ३७० हटविले. राहुल गांधी तेव्हा म्हणत होते रक्ताचे पाट वाहतील. पण, रक्ताचे पाट सोडा एक दगड उचलण्याची हिंमत कुणाची झाली नाही. राम मंदिर आधीचं बनायला हवे होते की नाही? काशी- मथुरा कॉरिडॉर बनायला हवे होते की नाही? काँग्रेसने मतासाठी रामलल्लाला तंबूत ठेवले,” अशी टीका अमित शाह यांनी केली.

हे ही वाचा:

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी म्हणाले, ‘तेलंगणात गुजरात मॉडेल राबवणार’

परिवारवादी लोक काळा पैसा लपवण्यासाठी भारताबाहेर बँक खाती उघडतात!

केंद्रात काँग्रेसची सत्ता येऊ दे मग मोदींना मारू; पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी

रविचंद्रन अश्विन धर्मशाला येथे १००व्या कसोटीसाठी सज्ज

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा