23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषआपल्या सहकाऱ्याचे पैसे चोरून पाकिस्तानी बॉक्सर पळाला!

आपल्या सहकाऱ्याचे पैसे चोरून पाकिस्तानी बॉक्सर पळाला!

पाकिस्तानसाठी ही अत्यंत लाजिरवाणीबाब, कर्नल नासिर अहमद

Google News Follow

Related

ऑलम्पिकसाठी पात्र होण्याचे स्वप्न उराशी बाळगून इटलीला गेलेल्या पाकिस्तानच्या बॉक्सरवर चोरीचा आरोप करण्यात आला आहे.जोहेब रशीद नावाच्या खेळाडूने आपल्याच सहकारी खेळाडूच्या पर्समधून पैसे चोरल्याचे वृत्त आहे.सध्या त्याचा शोध सुरु असून पाकिस्तानसाठी ही अत्यंत लाजिरवाणीबाब असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, जोहेब रशीद ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत भाग घेण्यासाठी इटलीला गेला होता.मात्र तो त्याच्या जोडीदाराच्या बॅगमधून पैसे चोरून गायब झाला आहे, अशी माहिती पाकिस्तान हौशी बॉक्सिंग फेडरेशनने मंगळवारी दिली.या प्रकरणाची माहिती इटलीतील पाकिस्तानी दूतावासाला देण्यात आली आहे, असे फेडरेशनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.तसेच याबाबत पोलिसात तक्रार देखील दाखल करण्यात आली असल्याचे देखील ते म्हणाले.

हे ही वाचा:

रणजी ट्रॉफी: मुंबईची तामिळनाडू संघावर मात, फायनलमध्ये धडक!

पंतप्रधान मोदींच्या मशालीने मुस्लिमांमध्ये पसरलेला अंधार दूर करेन!

तृणमूल काँग्रेस आमदाराने राम मंदिराबद्दल ओकली गरळ; अपवित्र स्थान म्हणत हिणवले

पंतप्रधान मोदींने केलं पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांचे अभिनंदन!

यासंदर्भात राष्ट्रीय महासंघाचे सचिव कर्नल नासिर अहमद म्हणाले की, ऑलिम्पिक स्पर्धेच्या पात्रतेसाठी जोहेब रशीद हा पाच सदस्यीय पथकासह इटलीला गेला होता.परंतु, जोहेब रशीदचे हे वर्तन देशासाठी आणि महासंघासाठी अत्यंत शरमेची बाब आहे.

ते पुढे म्हणाले की, महिला बॉक्सर लॉरा इकराम ही प्रशिक्षणासाठी बाहेर गेली होती.त्याचदरम्यान जोहेबने समोरच्या डेस्कवरून तिच्या खोलीच्या चाव्या घेतल्या आणि पर्समधून तिचे विदेशी चलन चोरले.तेव्हापासून तो हॉटेलमधून बेपत्ता आहे.त्याचा संपर्क देखील होत नाहीये. याबाबत पोलिसांना कळवण्यात आले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत, असे नासिर अहमद यांनी सांगितले.दरम्यान, जोहेब रशीद हा उदयोन्मुख खेळाडू असल्याचे बोलले जात आहे.गतवर्षी त्याने आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा