24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषपंतप्रधान मोदींने केलं पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांचे अभिनंदन!

पंतप्रधान मोदींने केलं पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांचे अभिनंदन!

पंतप्रधान मोदींनी ट्विटकरत दिल्या शुभेच्छा

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधान शेहबाज शरीफ यांची पुन्हा पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.पंतप्रधान मोदींनी ट्विटकरून त्यांचे अभिनंदन केले. सोमवारी (४मार्च) पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शेहबाज शरीफ यांनी शपथ घेतली .

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटकरत लिहिले की, ‘पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्याबद्दल शाहबाज शरीफ यांचे अभिनंदन.’ शाहबाज शरीफ यांनी सोमवारी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. २०२२ नंतर त्यांनी दुसऱ्यांदा देशाची सूत्रे हाती घेतली आहेत.

हे ही वाचा:

निवडणूक रोख्यांच्या तपशीलासाठी एसबीआयला हवी ३० जूनपर्यंत मुदतवाढ!

स्वतःच्या जुळ्या मुलांना पाहण्याआधी पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी धाव

रेस्टॉरंटमध्ये माऊथ फ्रेशनर खाल्ल्यानंतर पाच जण रुग्णालयात

डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवू शकणार

शाहबाज शरीफ यांनी एप्रिल २०२२ ते ऑगस्ट २०२३ पर्यंत पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून काम केले होते. सार्वत्रिक निवडणुकीत त्यांची पीएमएल-एन आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) यांनी आघाडी केली होती. या आघाडीकडून संयुक्त उमेदवार म्हणून शाहबाज शरीफ यांचे नाव पुढे करण्यात आले होते. ३३६ सदस्यांच्या सभागृहात पीएमएल-एन आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीला २०१ मते मिळाली होती.पाकिस्तानच्या ७७ वर्षांच्या इतिहासात शरीफ हे २४ वे पंतप्रधान आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा