भारतीय नौदलाचा खलाशी साहिल वर्मा जहाजातून बेपत्ता होऊन सुमारे एक आठवडा उलटून गेला आहे.खलाशाच्या शोधासाठी नौदलाकडून शोध मोहीम सुरु आहे.मात्र, अद्याप कोणतीही बातमी समोर आलेली नाही.खलाशी साहिल वर्मा हे अचानक बेपत्ता झाल्याने एकच खळबळ माजली असून त्यांचे कुटुंब देखील चिंतेत आहे.या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सीबीआयने हस्तक्षेप करावा, अशी मागणी बेपत्ता खलाशी साहिल वर्मा यांचे वडील सुभाष चंदर यांनी केली आहे.
सुभाष चंदर म्हणाले की, हे आश्चर्यकारक आहे की, एक सैनिक त्याच्या नौदलाच्या जहाजातून बेपत्ता झाला आहे आणि त्याचा शोध घेता येत नाही.मला सांगण्यात आले आहे की, जहाजावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये तपासले असता कोणीही समुद्रात पडल्याचे आढळले नाही. मग माझा मुलगा कुठे आहे?, असा सवाल सुभाष चंदर यांनी केला.जम्मूच्या घौ मनहासन भागातील रहिवासी असलेले सुभाष चंदर आणि त्यांची पत्नी रमा कुमारी यांनी आपला मुलगा साहिल वर्माच्या शोधासाठी या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री दखल घ्यावी अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.
हे ही वाचा:
विभागीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धेत आलोक, दुर्वाला सुवर्ण
भाजपाने चंदीगड उपमहापौरपदाची निवडणूक जिंकली
बेंगळुरू कॅफे बॉम्बस्फोटाचा तपास एनआयएकडे!
नफे सिंग राठी हत्या प्रकरणी गोव्यातून दोन शूटर्सना अटक!
दरम्यान, भारतीय नौदलातील खलाशी साहील वर्मा हा ‘सीमन-II’ या भारतीय नौदलाच्या जहाजावर कर्तव्यावर होता.मात्र, २७ फेब्रुवारी रोजी तो बेपत्ता झाला.नौदलाच्या जहाजातून बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली.साहील वर्माचा शोध घेण्यासाठी भारतीय नौदल ताबडतोब जहाजे आणि विमानांसह शोधमोहीम तातडीने राबवली आहे.मात्र, अद्याप शोध लागला नाही.ही शोधमोहीम अद्यापही सुरुच आहे, अशी माहिती भारतीय नौदलाच्या मुंबई मुख्यालय असलेल्या वेस्टर्न नेव्हल कमांडने (Western Naval Command)दिली.