24 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरराजकारणलॉकडाऊनची घोषणा आजच?

लॉकडाऊनची घोषणा आजच?

Google News Follow

Related

“महाराष्ट्रात उद्या लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच निर्णय घेतील. इतकंच नाही तर लॉकडाऊनबाबत नियमावली आजच तयार होईल”, अशी प्रतिक्रिया मुंबईचे पालकमंत्री आणि राज्याचे मंत्री अस्लम शेख यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना दिली.

“गेल्या आठवड्यापासून आपण मीटिंग घेऊन सगळे विरोधी पक्षाच्या लोकांना विश्वासात घेत आहोत. टास्क फोर्सशी चर्चा झाली. आपण लोकांचीही मतं जाणून घेत आहोत. ब्रेक द चेन यानुसार आज निर्णय होईल. लॉकडाऊन करणे गरजेचं आहे. मुंबई शहरामध्ये किंवा या राज्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त टेस्ट केले आहेत. त्यामुळे केस जास्त आहेत.” असे अस्लम शेख म्हणाले. साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करावं लागणार आहे. त्याबाबत नियमावली आज जाहीर होणार आहे. परप्रांतियांना आपण घरी जाण्यासाठी अडवत नाही, असंही अस्लम शेख यांनी सांगितलं.

लॅाकडाऊनमध्ये जिल्हाबंदीपासून इतर कडक निर्बंध असतील. लॅाकडाऊन जाहीर झाल्यानंतर दोन दिवसांनी अंमलबजावणी होणार आहे. लोकांना तयारी करण्यासाठी वेळ दिला जाईल, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वजेट्टीवार यांनी दिली. राज्यात ॲाक्सिजनचा तुटवडा असल्याने ॲाक्सिजन उत्पादन वाढवणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात लवकरच ॲाक्सिजन प्लांट सुरु होणार असंही ते म्हणाले.

हे ही वाचा:

टाळेबंदीच्या भीतीने मजूरांचे ‘गड्या आपुला गाव बरा’!

भारताला ‘हिंदूराष्ट्र’ घोषित करावे

क्राईम ब्रांच पाठोपाठ आता इओडब्ल्युच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

ठाकरे सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे वसई- विरारमध्ये रुग्णांचा मृत्यु

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक लॉकडाऊनची गरज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकीत व्यक्त केलीय. मात्र, याबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांत घेतला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. राज्यातील स्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेऊ, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. तसंच सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केलीय. राज्यातील स्थिती पाहता जनतेला थोडी कळ सोसावी लागेल. तज्ज्ञांच्या मते १४ दिवसांचा लॉकडाऊन गरजेचा आहे. तज्ज्ञांच्या मताला मुख्यमंत्र्यांनीही दुजोरा दिलाय. मात्र, मुख्यमंत्री किमान ८ दिवस कडक लॉकडाऊन करण्याच्या विचारात आहेत. ८ दिवसानंतर एक एक गोष्ट हळू हळू सुरु करु, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा