24.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषशरीरसौष्ठवपटूंचा ऑस्कर 'मुंबई श्री' स्पर्धा ९ मार्चला

शरीरसौष्ठवपटूंचा ऑस्कर ‘मुंबई श्री’ स्पर्धा ९ मार्चला

स्पार्टन न्यूट्रिशन मुंबई श्रीच्या पाठीशी सिद्धेश कदम; शहाजी राजे क्रीडा संकुलात आयोजन

Google News Follow

Related

मुंबईचे शेकडो शरीरसौष्ठवपटू वर्षभर ज्या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतात ती शरीरसौष्ठवाची श्रीमंती आणि पीळदार ग्लॅमर असलेली स्पार्टन न्यूट्रिशन ‘मुंबई श्री’ येत्या ९ मार्चला अंधेरीच्या शहाजीराजे क्रीडा संकुलात रंगणार आहे.

मुंबईतील शरीरसौष्ठवपटूंच्या हृदयात सर्वोच्च स्थानी असलेल्या या स्पर्धेचे यंदाही न भूतो न भविष्यती असेच दिमाखदार आयोजन सिद्धेश कदम यांच्या पुढाकाराने करण्यासाठी शरीरसौष्ठव संघटनेने कंबर कसली आहे. स्पार्टन न्यूट्रिशन मुंबई श्रीचे आयोजन आंतरराष्ट्रीय स्पर्धेला साजेसे असे व्हावे म्हणून शिवसेनेचे सचिव तथा युवा नेते सिद्धेश कदम हे सुद्धा मुंबई श्रीच्या पाठीशी उभे राहिले आहेत. मुंबईकर शरीरसौष्ठवपटूसाठी शरीरसौष्ठव खेळातील ऑस्कर असलेल्या या स्पर्धेचे यंदाही दिमाखदार आयोजन केले जाणार असल्याची ग्वाही बृहन्मुंबई आणि उपनगर शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर आणि किट्टी फणसेका यांनी दिली.

मुंबई श्रीसारख्या स्पर्धेचे ग्लॅमरस आणि भव्य दिव्य आयोजन करता यावे म्हणून बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटनेने यंदाही शहाजी राजे क्रीडा संकुलातच आयोजन करण्याचे ठरवले आहे.

हे ही वाचा:

ब्रिटनस्थित गँगस्टरने स्वीकारली नाफेसिंग राठी यांच्या हत्येची जबाबदारी

पुतीन यांची पाश्चिमात्य देशांना अण्वस्त्र युद्धाची धमकी

बिल्कीसवर अश्रू ढाळणारे ठाकरे संदेशखालीवर मौन का…

“सलीम कुत्तासोबत नाचणाऱ्या बडगुजरांचे संजय राऊत गॉडफादर”

सुमारे दहा लाखांच्या बक्षीसांचा वर्षाव

शरीरसौष्ठवपटूंना श्रीमंत करणार्‍या या स्पर्धेत लौकिकानूसार किमान २०० खेळाडू सहभाग घेतील, असा प्राथमिक अंदाज असला तरी खेळाडूंचा प्रतिसाद पाहता हा आकडाही ओलांडला जाऊ शकतो. उमेश गुप्ता, उबेद पटेल, संतोष भरणकर, उमेश पांचाळ, अक्षय खोत, विशाल गिजे, विशाल धावडे, अभिषेक लोंढे, संकेत भरम, प्रणव खातू, अमेय नेवगे, अमित साटम, विलास घडवले सारखे खेळाडू आपले मुंबई श्रीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करतील. गतवर्षी विजेत्याला सव्वा लाखांचे इनाम दिले गेले होते, तर यंदा त्यात २५ हजारांची वाढ करत ते दीड लाखाचे करण्यात आले आहे. तसेच द्वितीय आणि तृतीय विजेत्याला अनुक्रमे ७५ आणि ५० हजार रुपयांचे रोख इनाम दिले जाणार आहेत. ही स्पर्धा एकंदर आठ गटात होणार असून गटातील अव्वल पाच खेळाडूंना १५,१२,१०,८,५ हजार असे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर पुढील पाच क्रमांकानाही एक हजारांचे उत्तेजनार्थ बक्षीस दिले जाईल. या स्पर्धेत खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्यामुळे वजन तपासणी ९ मार्चला स्पर्धेच्या ठिकाणी सकाळी १०.०० ते ०१.०० या वेळेत घेतली जाणार आहे. महिला खेळाडूंचा सहभाग दरवर्षी वाढत असल्याने महिला शरीरसौष्ठव व महिला फिटनेस फिजिक या स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले आहे.

फिटनेस फिजीक खेळाडूंनाही मुंबई श्रीचे वेध

फिटनेसची क्रेझ अवघ्या मुंबापुरीत आहे. त्यामुळे सध्याची युवा पिढी मोठ्या संख्येने फिटनेस फिजीक प्रकाराकडे वळली आहे. या स्पर्धेत केवळ दोनच गट असले तरी या दोन गटात शंभरपेक्षा अधिक खेळाडूंचा सहभाग अपेक्षित आहे. या गटातही खेळाडूंवर रोख बक्षीसांचा वर्षाव केला जाणार आहे, अशी माहिती सरचिटणीस राजेश सावंत यांनी दिली.

स्पर्धेच्या अधिक माहिती संदर्भात सर्व व्यायाम शाळा आणि स्पर्धकांनी सुनील शेगडे – ९२२३३४८५६८, विशाल परब – ८९२८३१३३०३, राजेश निकम – ९९६९३६९१०८, अब्दूल मुकादम – ७९७७३२१८८५, राम नलावडे – ९८२०६६२९३२ यांच्याशी संपर्क साधावा.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा