23.4 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषढाक्यात सातमजली इमारतीला आग; ४३ जणांचा मृत्यू

ढाक्यात सातमजली इमारतीला आग; ४३ जणांचा मृत्यू

Google News Follow

Related

बांगलादेशची राजधानी ढाका शहरात एका सातमजली इमारतीला लागलेल्या आगीत ४३ जणांचा मृत्यू तर, २२ जण जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे सांगितले जात आहे. या इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर असणाऱ्या रेस्टॉरंटमध्ये गुरुवारी रात्री नऊ वाजून ५० मिनिटांनी ही आग लागली. लवकरच ही आग वरच्या मजल्यापर्यंत पसरत गेली. आग लागल्याने या इमारतीमध्ये ७५ जण अडकले होते. त्यातील ४२ जण बेशुद्ध पडले. त्यांना इमारतीमधून बाहेर काढावे लागले.

आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. ढाका मेडिकल कॉलेज हॉस्पिटलात ३३ जणांचा मृत्यू झाल्याचे तर, शेजारच्या शेख हसिना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बर्न अँड प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटलात १० जणांचा मृत्यू झाल्याचे बांगलादेशचे आरोग्यमंत्री डॉ. सामंत लाल सेन यांनी सांगितले. दोन्ही रुग्णालयांत २२ जणांवर उपचार सुरू आहेत. त्यातील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. तर, ज्यांचा जीव वाचवण्यात आला आहे, त्यांची श्वसनयंत्रणा बिघडली आहे, असे सांगण्यात आले आहे.

तसेच, मृतदेहांची अवस्थाही बिकट झाल्याने त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. मृतांची संख्या आणखी वाढेल, अशी भीती व्यक्त होत आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र त्या दृष्टीने तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

आयएसआयला गुप्त माहिती दिल्याप्रकरणी बिकानेर फायरिंग रेंजच्या संशयित कॅन्टीन ऑपरेटरला अटक

२० भारतीय अजूनही रशियात, त्यांच्या सुटकेसाठी भारत सरकार प्रयत्नशील!

अखेर शाहजहां शेख सहा वर्षांसाठी झाला निलंबित

धरमशाला कसोटीत केएल राहुल बाहेर; बुमराहचे पुनरागमन

प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे पहिल्या मजल्यावर आग लागल्यानंतर अनेकजण वरच्या मजल्यावर पळाले होते. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी शिडीच्या मदतीने त्यांची सुटका केली. काही जणांनी जीव वाचवण्यासाठी इमारतीवरून उड्या मारल्या. काहींनी इमारतीच्या काचा तोडून खाली उडी मारली. या इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर सिलिंडर ठेवण्यात आले होते. इतकेच नव्हे तर जिन्यावरही सिलिंडर ठेवण्यात आले होते, असे समजते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा