24.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषजामतारामध्ये भीषण अपघात; १२ प्रवाशांना रेल्वेने चिरडले

जामतारामध्ये भीषण अपघात; १२ प्रवाशांना रेल्वेने चिरडले

पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

Google News Follow

Related

झारखंडच्या जामतारा शहरात मोठा रेल्वे अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात आतापर्यंत १२ प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत, अशी माहिती उघड झाली आहे. जखमींपैकी अनेक जण गंभीर असल्याचेही वृत्त आहे. जामतारा आणि विद्यासागर रेल्वे स्थानकांदरम्यान हा अपघात झाला असून रेल्वेने रुळांवरील काही प्रवाशांना चिरडलं आहे. अंधार असल्यामुळे रेल्वेने नेमकी किती जणांना धडक दिली आहे याची आकडेवारी स्पष्ट झालेली नाही. या अपघातात मृत्यू झालेल्या दोन जणांचे मृतदेह बचावपथकांना सापडले आहेत. दरम्यान, जामतारा ते विद्यासागर स्थानकांदरम्यान बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे.

माहितीनुसार, बंगळुरू- यशवंतपूर एक्सप्रेस या मार्गावरून जात असताना रेल्वे रुळाच्या बाजूने टाकण्यात आलेली माती गाडीच्या वेगामुळे वर उडत होती. धूळ आणि माती रेल्वेच्या खिडकीपर्यंत उडत होती. त्यामुळे त्या रेल्वेमधील प्रवाशांचा गैरसमज झाला आणि प्रवाशांना वाटले की, गाडीत आग लागली. त्यामुळे काही प्रवाशांनी रेल्वेची साखळी ओढली आणि गाडीचा वेग कमी होताच बाहेर उडी मारली. त्याचवेळी एक ईएमयू ट्रेन बाजूच्या रुळावरून जात होती. त्यामुळे बंगळुरू-यशवंतपूर एक्सप्रेसमधून बाहेर उड्या मारणारे प्रवासी या ईएमयू ट्रेनखाली आले. यामध्ये १२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, या अपघाताबाबत रेल्वेनेही अधिकृत निवेदन जारी केलं आहे. परंतु, रेल्वेने आग लागल्याच्या अफवेचा कुठेही उल्लेख केलेला नाही. रेल्वेने सांगितलं आहे की, “प्रवाशांनी अलार्म चेन ओढल्याने ट्रेन नंबर १२२५४ थांबवण्यात आली होती. त्यानंतर ट्रेनमधील काही प्रवासी उतरून बाजूच्या रुळावर आले. त्याचवेळी बाजूच्या रुळावरून जाणाऱ्या एमईएमयू ट्रेनने या प्रवाशांना धडक दिली. तसेच रेल्वेने म्हटलं आहे की, या अपघातात मृत्यू झालेले, जखमी झालेल्यांपैकी काहीजण रेल्वेचे प्रवासी नव्हते. याप्रकरणी तपास करण्यासाठी तीन सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे.”

हे ही वाचा:

पवार कृषिमंत्री होते तेव्हा शेतकऱ्यांपर्यंत पॅकेज पोहोचण्याआधी लुटले जायचे!

‘कलम ३७०’ने ५० कोटींचा टप्पा ओलांडला

आयसीसी क्रमवारीत जैस्वालची ‘यशस्वी’ मुसंडी

अकबर महान कसला?, तो तर बलात्कारी!

या अपघाताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, जामतारा येथे झालेल्या अपघाताची बातमी ऐकून दुःख झालं. ज्यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या सहवेदना आहेत. जखमी लोक लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा