24.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेष'कलम ३७०'ने ५० कोटींचा टप्पा ओलांडला

‘कलम ३७०’ने ५० कोटींचा टप्पा ओलांडला

Google News Follow

Related

कलम ३७० या चित्रपटात यामी गौतमने आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावले आहे. तिचा अॅक्शन पट आर्टिकल ३७० चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट २३ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला असून जगभरातही चांगली कमाई करत आहे. या चित्रपटावर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. कलम ३७० मुळे भारतासह परदेशातही चांगला व्यवसाय होत आहे. सिनेमाचा रिव्ह्यू चांगला असल्याने प्रत्येकजण त्याचं कौतुक करणं थांबवत नाहीये. या चित्रपटाची खास गोष्ट तो चांगला कलेक्शन करत आहे. या चित्रपटाचे वर्ल्डवाइड कलेक्शन समोर आले असून लवकरच तो ५० कोटी क्लबमध्ये सामील होणार आहे.

 कलम ३७० मध्ये यामी गौतम पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. या भूमिकेचे भरपूर कौतुक होताना दिसत आहे. भारतातील कलम ३७० चे पाच दिवसांचे कलेक्शनही समोर झाले आहे. 

जगभरात इतके कलेक्शन
यामी गौतमच्या आर्टिकल ३७०ने पहिल्याच दिवशी ६.१२ कोटींचा गल्ला जमवला होता. या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ९.०८ कोटी, तिसऱ्या दिवशी १०.२५ कोटी, चौथ्या दिवशी ३.६० कोटी आणि पाचव्या दिवशी ३.५५ कोटींचा गल्ला जमवला आहे. ज्यानंतर एकूण कलेक्शन ३२.६० कोटींवर गेले आहे. वर्ल्डवाइड कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने ४४.६० कोटींचा गल्ला जमवला आहे.

हेही वाचा :

देवेंद्र फडणवीसांच्या टीकास्त्रानंतर मनोज जरांगेंनी मागितली माफी

सिद्धू मूसवालाची आई ५८ व्या वर्षी गरोदर

अकबर महान कसला?, तो तर बलात्कारी!

आयसीसी क्रमवारीत जैस्वालची ‘यशस्वी’ मुसंडी

 काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या निर्णयावर कलम ३७० आधारित आहे. अरुण गोविल यांनी या चित्रपटात पंतप्रधान मोदींची भूमिका साकारली आहे. किरण कर्माकर अमित शहा यांची भूमिका साकारत आहेत. या चित्रपटात जवान फेम प्रियमणी देखील आहे.

 पंतप्रधान मोदींने केले कौतुक
कलम ३७० रिलीज होण्यापूर्वीच पंतप्रधान मोदींनी या चित्रपटाचं कौतुक केले होते. ते म्हणाले होते, या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांना योग्य ती माहिती मिळेल.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा