भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम बंगाल युनिटचे अध्यक्ष आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी २८ फेब्रुवारी रोजी सोशल मीडिया पोस्टमध्ये संदेशखली लैंगिक शोषण आणि जमीन हडप प्रकरणातील मुख्य आरोपी शाहझान याच्याबद्दल खळबळजनक दावा केला आहे. तो पोलिसांच्या कोठडीत अगदी फाईव्ह स्टार सुविधेसह सुरक्षीत आहे.
त्यांनी असा दावा केला आहे की शाहजान हा काल रात्री १२ वाजल्यापासून पोलिसांच्या कोठडीत आहे. त्याची कोठडीमध्ये योग्य अशी काळजी घेतली जाईल यासाठी अत्यंत प्रभावशाली मध्यस्थामार्फत ममता बनर्जी यांनी पोलिसांशी
वाटाघाटी केल्या आहेत त्यात त्या यशस्वी सुद्धा झाल्या आहेत. अधिकारी यांनी असे सुद्धा म्हटले आहे कि तो कारागृहात असताना त्याला अगदी फाईव्ह स्टार सुविधा दिल्या जातील. त्याच्याकडे मोबाईल फोन असेल. त्याच्या मध्यामातून तो तृणमूल कॉंग्रेस पक्षाचे काम करू शकेल. वूडबर्न वार्डमधील एक बेडसुद्धा त्याच्यासाठी रिकामा ठेवण्यात येणार आहे. जर त्याला वेळ घालवायचा असेल तर तो तिथे जाऊ शकेल.
बेताज बादशाह म्हणून प्रसिद्ध असलेले टीएमसीचे शाहजहान शेख हे बांगलादेश सीमेला लागून असलेल्या पश्चिम बंगालच्या संदेशखळी येथील एक प्रभावशाली व्यक्ती आहेत. परिसरातील महिलांनी त्याच्यावर आणि त्याच्या साथीदारांवर लैंगिक अत्याचार आणि धमकावल्याचा आरोप केला आहे. तुम्ही नवरा असाल पण तुमचा हक्क बजावू शकत नाही. ते तुमच्या बायकोला एका रात्रीसाठी घेऊन जायचे. ते पूर्णपणे समाधानी होईपर्यंत स्त्रियांना त्यांच्या बंदिवासातून सोडणार नाहीत. त्यांच्यासोबत २०-३० गुंड आहेत. ते बाईकवर यायचे असे एका महिलेने सांगितले होते.
हेही वाचा..
राजीव गांधींच्या मारेकऱ्याचा चेन्नईच्या रुग्णालयात मृत्यू!
देवेंद्र फडणवीसांच्या टीकास्त्रानंतर मनोज जरांगेंनी मागितली माफी
हिमाचलमध्ये काँग्रेस दुभंगली; मंत्र्यांचा राजीनामा आणि राज्यसभेत क्रॉस वोटिंग
पिसेतल्या आगीनंतर मुंबईत ५ मार्चपर्यंत १५ टक्के पाणीकपात!
शेकडो पीडितांचा सतत निषेध आणि विरोधकांनी तसेच प्रसारमाध्यमांचा सतत आक्रोश असूनही ममता बॅनर्जींच्या प्रशासनाने अद्याप फरार असलेल्या त्यांच्या पक्षाच्या बलाढ्य व्यक्तीला अटक केली नाही. गेल्या सहा दिवसांत ग्रामस्थांच्या विरोधात अतिरेक केल्याच्या ७०० हून अधिक तक्रारी ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर यांच्याकडे आल्या आहेत. रेशन घोटाळ्याच्या चौकशीचा एक भाग म्हणून त्याच्या निवासस्थानावर छापा टाकण्यासाठी पोहोचलेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यामागील तो सूत्रधार होता.