दिल्लीतील दारू घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात पुन्हा एकदा समन्स जारी केले आहेत.यावेळी ईडीने त्याला ४ मार्च रोजी दिल्लीतील एजन्सीच्या मुख्यालयात चौकशीसाठी बोलावले आहे.
ईडीने केजरीवाल याना पाठवलेले हे आठवे समन्स आहे.यापूर्वी केजरीवाल यांना सातवे समन्स पाठवण्यात आले होते.त्यावर केजरीवाल म्हणाले होते की, जर न्यायालयाने या संदर्भात आदेश दिला तर ते ईडीसमोर हजार राहू.
हे ही वाचा:
कुलस्वामीच्या दर्शनासाठी सुमित्रा महाजन पोहोचल्या नेवरे गावात!
विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राचे मोठे योगदान दर्शविणारा अर्थसंकल्प
अनंत अंबानीचा “वनतारा”, हत्तींपासून वाघापर्यंत मिळाले अत्याधुनिक घर!
डाव्यांना केरळमधून कॉंग्रेसची हकालपट्टी करायची आहे
ईडीकडून केजरीवाल यांना २२ फेब्रुवारी रोजी सातवे समन्स पाठवण्यात आले होते आणि २६ फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे सांगितले होते.आतापर्यंत केजरीवाल एकदाही एजन्सीसमोर हजार झालेले नाहीत.या संदर्भात आम आदमी पक्षाकडून एक निवेदन जारी करण्यात आले.हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे आणि त्याची सुनावणी १६ मार्च रोजी होणार आहे, असे निवेदनात म्हटले होते.पुढे निवेदनात म्हटले की, एजन्सीने वारंवार समन्स जारी करण्याऐवजी न्यायालयाच्या आदेशाची प्रतीक्षा करावी, असे आप पक्षाकडून सांगण्यात आले होते.
एजन्सीने पाठविलेला हे समन्स ‘बेकायदेशीर’ असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे.तसेच केजरीवाल यांनी अंमलबजावणी संचालनालयाला पत्र लिहून समन्स मागे घेण्याची मागणीही केली होती.