महाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढ भयावह वेगाने होत असल्याने उपलब्ध आरोग्य यंत्रणा कोलमडून गेली. बेड्स उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांचे हाल झाले. आता त्यांच्या मदतीला रेल्वे धावली आहे. रेल्वेने आपल्या डब्यांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापून दिले आहेत.
नंदुरबारमध्ये रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यासाठी बेड्सची कमतरता होती. अशा वेळेस पश्चिम रेल्वेने विलगीकरणाच्या सोयी करून दिल्या आहेत. पश्चिम रेल्वेने २१ डबे परिवर्तीत करून दिले आहेत. या प्रत्येक डब्यात १६ रुग्णांसाठी विलगीकरणाची सोय करण्यात आली आहे. त्याबरोबरच ऑक्सिजन, उकाड्याचा त्रास होऊ नये यासाठी कूलर, अशा इतर सुविधा सुद्धा पुरवण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा:
महाराष्ट्रात कोविड रुग्णांमध्ये घट
नितीन गडकरींच्या एका फोननंतर चार हजार ‘रेमडेसिव्हीर’ इंजेक्शन हजर
महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यातून प्रशासनाच्या ढिसाळ आणि भोंगळ कारभाराची निरनिराळी उदाहरणे देखील दिसत आहेत. महाराष्ट्रातील विविध भागांत रुग्णांसाठी बेड्स अपुरे पडू लागले होते.
कालची महाराष्ट्राची आकडेवारी काहीशी दिलासादायक आहे. एका दिवसातील रुग्णवाढ ६० हजारच्या रुग्णांच्या पलिकडे गेली होती, ती सुमारे ५१ हजारच्या आसपास स्थिरावली आहे.
संपूर्ण देशातील कोरोनाची आपात्कालिन स्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने स्पुतनिक-५ या लसीच्या वापराला देखील परवानगी दिली आहे.